Ajit Pawar अडचणीत येणार? निधीवाटपावरुन आमदाराचा खळबळजनक दावा | Sakal News

Mulshi News: 'तालुक्यासाठी जास्त निधी हवा असेल तर नावही बदलावं लागतं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच हे शक्य' ‘इतर आमदारांना १० कोटी, मला थेट २५ कोटी मिळतात’ असा खळबळजनक दावा करत मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद–पंचायत समिती प्रचारसभेत वक्तव्य..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभेत मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'आम्हाला तालुक्यासाठी अधिकचा निधी आणायचा असेल, तर नावसुद्धा बदलावे लागते. हे फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच शक्य आहे,' असे खळबळजनक विधान त्यांनी यावेळी केलं. आपल्या भाषणात आमदार शंकर मांडेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना थेट निधी वाटपावर भाष्य केलं. 'अजितदादा इतर आमदारांना १० कोटी रुपये देत असतील, तर मला २५ कोटी रुपये देतात. कारण मुळशी तालुक्याच्या विकासासाठी मला जास्त निधी लागतो,' असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभेत एकच चर्चेला उधाण आलं. मुळशी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळवताना पक्ष, नाव किंवा ओळख बदलावी लागली तरी ते करायला तयार असल्याचं सूचक विधान त्यांनी केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि निधी वितरण पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रचार सभेत शंकर मांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन करताना, 'अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच मुळशी तालुक्याला जास्तीत जास्त निधी आणि विकास मिळू शकतो,' असं ठामपणे सांगितलं. आमदार शंकर मांडेकरांच्या या दाव्यामुळे विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, आगामी काळात या वक्तव्यावरून राजकीय वाद रंगण्याची चिन्हं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com