वयाच्या ८८ व्या वर्षीही हातात लाठी-काठी, तलवारबाजी आणि साहसी खेळांचा थरार! वय म्हणजे केवळ एक आकडा, हे आपल्या जिद्दीने सिद्ध करणाऱ्या शांताबाई पवार यांची ही प्रेरणादायी कहाणी. ज्या वयात अनेक जण विश्रांती घेतात, त्या वयात शांताबाई आजी स्वाभिमानाने स्वतःच्या कलेच्या जोरावर जगत आहेत. वडिलांकडून मिळालेली मर्दानी खेळांची परंपरा त्यांनी आजही जपली आहे. लाठी-काठी, तलवारबाजी आणि बाटलीवर उभे राहण्यासारखे साहसी खेळ सादर करत त्यांनी देशभरात आपल्या कलेची ओळख निर्माण केली आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर जगणाऱ्या शांताबाई आजींनी अनाथ मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारीही स्वीकारली. अकरा मुलींचे संगोपन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचा संघर्ष, स्वाभिमान, समाजासाठीची तळमळ आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.