अहिल्यानगर तालुक्यातील जामखेड येथील एका निवासी शाळेत घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील नववी इयत्तेतील काही विद्यार्थ्यांनी आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना मोबाईलवर चित्रीत करून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली. सदर प्रकार अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध मुलांसाठी असलेल्या निवासी विद्यालयात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. व्हिडिओमध्ये संबंधित मुलाला मध्यभागी उभे करून त्याच्यावर बेल्टने मारहाण केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.