राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध करण्यात आला असून त्यांचे पद घटनाबाह्य असल्याची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पक्षातील अध्यक्षपद, कार्यकारिणी आणि संघटनात्मक निर्णयांवरून यापूर्वीही मतभेद समोर आले आहेत. त्यातच तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवार गटाच्या राजकीय भूमिकेबाबतही विविध चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पातळीवरील या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. तटकरे यांचे प्रदेशाध्यक्षपद नेमके कोणत्या आधारावर घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे? निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत? या तक्रारीमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणामागची माहिती....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.