मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भातील एकतर्फी निर्णयांवरून सुरू असलेल्या तीव्र वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या निलंबनाची आणि कामापासून रोखण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. मात्र, या प्रकरणी न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस जारी करून स्पष्टीकरण मागवले आहे. मतदार नोंदणीच्या 'फॉर्म-६' मधील कथित बदलांवर आणि निवडणूक आयोगातील बहुमताच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांवर कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. "जर कोणताही निर्णय बेकायदेशीरपणे घेण्यात आला असेल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील," असा इशारा देत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीत रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.