व्हिडिओ | Videos
Sangram Jagtapचं वादग्रस्त विधान, Supriya Sule चांगल्याच भडकल्या, म्हणाल्या..| Ajit Pawar | Sakal News
Supriya Sule On Sangram Jagtap: हिंदूंनी केवळ हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करावी असे वादग्रस्त विधान करणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाईची मागणी; कारणे दाखवा नोटीस पुरेशी नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, सुप्रिया सुळे यांची नागपुरात मागणी
Sangram Jagtap: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'हिंदूंनी फक्त हिंदूंच्याच दुकानांतून खरेदी करावी' असे वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र एवढ्यावर थांबून चालणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टीच करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रविवारी नागपूर दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. त्या म्हणाल्या, आमदार संग्राम जगताप यांचे विधान हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे.
