ठाकरे की शिंदे? चिन्हावर सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी ! Shiv Sena Symbol Case

धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीतील प्रमुख अपडेट्स

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात (सुप्रीम कोर्ट) आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाचे घटनात्मक अधिकार, विधिमंडळातील बहुमत आणि पक्षाची संघटनात्मक रचना या मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी दोन्ही गटांना राखीव चिन्ह न देता स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवण्याचा पर्याय का दिला गेला नाही, असा थेट आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. यावर शिंदे गटाच्या वकिलांनी पुढील सुनावणीत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले. कोर्टात झालेला संपूर्ण युक्तिवाद आणि न्यायाधीशांच्या टिप्पणीचा सविस्तर आढावा या व्हिडीओमध्ये पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com