ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-५ आणि विशेष पथकाने मोठ्या गुप्त कारवाईत ५ कोटी रुपयांच्या सुपारी प्रकरणातील दोन मुख्य पसार आरोपींना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून ताब्यात घेतले आहे. गेल्या ६ दिवसांपासून पोलीस पथक आरोपींचा माग काढत होते. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रयागराज येथील व्हीव्हीआयपी घाट परिसरात सापळा रचून आरोपींना गजाआड करण्यात आले. या गंभीर गुन्ह्यात वापरण्यात आलेली अल्टो कार नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालय परिसरातून पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, आता एकूण अटक आरोपींची संख्या वाढली आहे. या ५ कोटींच्या सुपारीमागे महाराष्ट्रातील कोणत्याही बड्या राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास केला जात आहे. आरोपींना ठाण्यात आणल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.