Pradeep Purnekar case updates : 'माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार?' ४० दिवसांनंतर राम पूर्णेकरांचा सवाल

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणाला ४० दिवस; मुख्य आरोपींना अटक नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप. राम पूर्णेकर यांनी न्यायासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर लावला.

ठाण्यातील मानपाडा परिसरातील उद्धव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूच्या घटनेला ४० दिवस उलटले आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर लावत 'माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार?' असा सवाल उपस्थित केला. या बॅनरमधून त्यांनी तपासाच्या गतीबाबत आणि आरोपींच्या अटकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांच्या मृत्यूला ४० दिवस उलटूनही न्याय मिळत नसल्याने राम पूर्णेकर यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...