स्वप्नांपुढे गुडघे टेकले, Marathi Actor Tushar Ghadigaonkarने का केला आयुष्याचा शेवट? Ankur Wadhave

Marathi Actor Tushar Ghadigaonkar News: अभिनेता-दिग्दर्शक तुषार घाडीगांवकर याची आत्महत्या; कलाक्षेत्रातील कामाची टंचाई, मानसिक तणाव आणि नैराश्याचा फटका जाणवतोय, मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली..

झगमगाटाने भरलेल्या अभिनय क्षेत्रामागचं वास्तव अनेकदा वेदनादायक असतं, याचं आणखी एक दुःखद उदाहरण समोर आलं आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून ओळख असलेले तुषार घाडीगांवकर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून कलाक्षेत्रात कामाची कमतरता, प्रकल्पांचे मर्यादित संख्येने उत्पादन आणि कलाकारांची वाढती संख्या यामुळे अनेक कलाकार नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. तुषार घाडीगांवकरही अशाच आर्थिक व मानसिक तणावाला सामोरे जात होते, अशी माहिती जवळच्या मित्रपरिवाराकडून मिळाली आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत मोठ्या संख्येने कलाकार कामाविना घरी बसले आहेत आणि ही स्थिती तुषार यांच्यासारख्या कलाकारांवर गंभीर परिणाम करत आहे. त्यांच्या जाण्याने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार हरपल्याचं दुःख साऱ्या क्षेत्राला जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com