

Illegal Sand Transport
sakal
उमरेड : बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या सरकारी वाहनाला ट्रकने धडक देत हल्ला केल्याची धक्कादायक घटना उमरेड-भिवापूर मार्गावर घडली. सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावरच हल्ला झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.