Kuldeep Sengar Bail: दिल्ली HC च्या निर्णयावर संताप | पीडितेचा आक्रोश | Unnao Case | Sakal News

Unnao Case: उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन, पीडितेच्या कुटुंबाचा संताप; CBI कडून सुप्रीम कोर्टात आव्हान..

२०१७ मध्ये देशभर खळबळ उडवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आणि भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाविरोधात पीडितेच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी दिल्ली हायकोर्टाबाहेर निदर्शने केली असून, न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, सीबीआयने या जामीन आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सीबीआयचा दावा आहे की, हा निर्णय POCSO कायद्याच्या मूळ उद्देशाच्या विरोधात असून पीडितेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, कुलदीप सेंगरला २०१९ मध्ये या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यामुळे तो सध्या तरी तुरुंगातच आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com