Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

वैजापूरमध्ये रोहित पठारे हत्या प्रकरणाने खळबळ. जुन्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये २४ वर्षीय रोहित पठारे याच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून रोहितला घरातून उचलून नेऊन झाडाला बांधल्याचा आरोप आहे. त्यानंतर तलवार, कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच स्क्रू ड्रायव्हरने शरीरावर वार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मारहाणीदरम्यान रोहितने पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. गंभीर जखमी रोहितवर रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या आईने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वैजापूर परिसरात संताप व्यक्त होत आहे. नेमका वाद काय होता? हल्ला कसा झाला? या प्रकरणातील पोलीस तपास आणि पुढील कारवाई काय आहे? जाणून घ्या सविस्तर रिपोर्टमध्ये...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...