Rahul Gandhi : भाजप प्रवेशाच्या आधी राहुल गांधींचा फोन अन् राहुल बोंद्रे नॉट रिचेबल! आजचा BJP प्रवेश होणार की नाही?

Rahul Bondre: काँग्रेसमधून भाजपकडे झुकणाऱ्या राहुल बोंद्रेंचा मोबाईल बंद, राहुल गांधींच्या संपर्कानंतर आजचा प्रवेश अनिश्चित; दोन्ही पक्षांत तणावाचे वातावरण

Rahul Gandhi : चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मुंबईत भाजप प्रवेशाची तयारी सुरू असतानाच, ऐन पूर्वसंध्येला काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी थेट फोनवरून (व्हॉट्सॲप कॉल) संवाद साधला. "आम्ही तुमच्यासोबत आहोत, संकटाच्या काळात धीर सोडू नका आणि दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका; पराभवानंतरच विजय असतो," असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांची मनधरणी केली. या संवादानंतर राहुल बोंद्रे अत्यंत भावूक झाले असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राहुल गांधींच्या या एका फोनमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्याचे आणि काँग्रेसमध्येच राहण्याचे संकेत दिल्याचे समोर आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com