Fact Check : ऐश्वर्या रायने लंडनस्थित उद्योगपतीशी लग्न केले नाही, एडिटेड फोटो व्हायरल

Viral Post : एका सोशल मीडिया पोस्टमध्ये बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या लंडनस्थित उद्योगपती वाचे मनुकियांसोबतचे फोटो शेअर केले असून, दोघांनी लग्न केल्याचा दावा केला आहे.
fact check
fact check Esakal
Updated on: 

Created By: PTI Fact Check

Translated by: Sakal Digital Team

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने लंडनस्थित उद्योगपती वाचे मानुकियांसोबत ( Vatche Manoukian) दुसरे लग्न केले असल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट अलीकडेच व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये पुढे असा दावा करण्यात आला आहे की, हा विवाह तिचा पती अभिषेक बच्चन यांच्या कथित घटस्फोटानंतर झाला आहे.

या दाव्याचे समर्थन करण्यासाठी युजर्सनी ऐश्वर्या राय बच्चनचे उद्योगपती वाचे मानुकियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. पडताळणीनंतर पीटीआय फॅक्ट चेक डेस्कला असे आढळले की फोटो डिजिटली बदलल्या गेल्या आहेत. मूळ फोटोंमध्ये फक्त ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा नवरा अभिषेक बच्चन होते. हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, त्यात कोणताही आधार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com