Fact Check : चेहऱ्यावर नारळ पाणी लावल्याने पिंपल्स, डाग कमी होऊन चेहरा उजळतो? व्हायरल पोस्टमागे हे आहे सत्य

Fact Check Can Coconut Water Remove Dark Spots : नारळ पाणी त्वचा उजळवण्याची आणि डाग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे असा दावा करणारी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामागे काय सत्य आहे जाणून घेऊया.
Fact Check Can Coconut Water Remove Dark Spots
Fact Check Can Coconut Water Remove Dark Spotsesakal
Updated on

Created By : THIP Media

Translated By: Sakal Digital Team

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात असे सांगितले जात आहे की, रोज दोन वेळा नारळ पाणी चेहऱ्यावर लावल्यास सर्व डाग दूर होतात आणि त्वचा नैसर्गिकपणे उजळते. या दाव्यावर लाखो प्रतिक्रिया आल्या आहेत. तर जाणून घेऊया याच्यामागे काय सत्य आहे.

पोस्टमधील दावा कोणता?

पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, नारळ पाणी चेहऱ्यावर लावल्याने सर्व डाग (dark spots) दूर होऊ शकतात आणि त्वचा नैतिकपणे चमकदार होईल.

Fact Check Can Coconut Water Remove Dark Spots
Fact Check Can Coconut Water Remove Dark Spotsesakal

तथ्य पडताळणीत काय आढळले?

नारळ पाणी त्वचेला हायड्रेट करते आणि त्यात काही अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असू शकतात, ज्यामुळे त्वचेला लाभ होऊ शकतो. तथापि, या घटकांचा डाग कमी करण्यावर प्रभाव कमी आहे, आणि त्यासाठी वैज्ञानिक पुरावा नाही. डाग किंवा हायपरपिगमेंटेशन सामान्यतः सूर्यप्रकाश, मुरुमांचे ठसे, किंवा हार्मोनल बदलांमुळे होतात. यावर उपचार करण्यासाठी जीवनसत्त्व C, नायसिनॅमाईड किंवा डर्मेटोलॉजिक प्रक्रियांसारखे घटक आवश्यक असतात.

पुरावा १

डॉ. एकांश शेखर, लखनौ येथील त्वचारोग तज्ञ, कास्मेटोलॉजिस्ट, आणि सौंदर्यतज्ञ, यांचे मत आहे की, नारळ पाणी प्यायल्याने किंवा चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळण्याचे किंवा डाग कमी करण्याचे कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नाही. ते म्हणतात, "नारळ पाणी त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करत असले तरी त्याचा प्रभाव कमी आहेत. वास्तविक परिणामांसाठी व्हिटॅमिन C, नायसिनॅमाईड, आणि अल्फा अर्बुटिन यासारख्या घटकांचा वापर करणे आवश्यक आहे."

पुरावा २

नारळ पाण्यामुळे त्वचा उजळ होईल किंवा मुरुमांवर उपचार होईल, हे देखील चुकीचे आहे. अनेक सोशल मिडिया पोस्ट्समध्ये असं सांगितलं जातं, पण त्यात कोणताही वैज्ञानिक आधार नाही. नारळ पाणी त्वचेला काही प्रमाणात हायड्रेशन देऊ शकतं, परंतु त्याचे उपचारात्मक फायदे नाहीत.

पुरावा ३

सपोर्टसाठी, डॉ. राशी सोनी, मुंबई येथील त्वचारोग तज्ञ, यांचे मत आहे की, डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेला नैसर्गिकपणे उजळवण्यासाठी, एक साधे स्किनकेअर रूटीन खूप प्रभावी ठरू शकते. त्यासाठी जीवनसत्त्व C, नायसिनॅमाईड, अल्फा अर्बुटिन यांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. नियमितपणे AHA आणि BHA वापरणे, त्वचेची मृत कोशिका काढून टाकण्यात मदत करू शकते.

पुरावा ४

त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलेल्या घटकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये जीवनसत्त्व C, लिकोरिस अर्क, नायसिनॅमाईड, अल्फा अर्बुटिन, आणि रेटिनॉइड्स यांचा समावेश होतो. त्वचा चमकवण्यासाठी ह्या घटकांचा वापर अधिक प्रभावी ठरतो.

पुरावा ५

 नारळाचे पाणी शरीराला हायड्रेटिंग आणि ताजेतवाने करत असले तरी, ते काळे डाग किंवा हायपरपिग्मेंटेशनसाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय नाही. त्वचारोगतज्ज्ञ दररोज सनस्क्रीन वापरण्याचे महत्त्व सांगतात. सनस्क्रीनबद्दल चुकीची माहितीदेखील पसरवली जात आहे, काहीजण खोटे दावा करतात की ते त्याचा फायदा नाही किंवा मेलेनोमाशी देखील जोडलेले आहेत . प्रत्यक्षात, सनस्क्रीन यूव्ही नुकसानापासून संरक्षण करतात , ज्यामुळे काळे डाग दूर होतात. फक्त एवढेच नाही तर योग्य आहार देखील त्वचेसाठी महत्वाचा असतो.

निष्कर्ष

नारळ पाणी त्वचेसाठी हायड्रेशन देणारे आहे आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे असू शकतात, परंतु त्याचा डाग कमी करण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हा दावा चुकीचा आहे. डाग कमी करण्यासाठी योग्य त्वचारोगतज्ञांची सल्ला घेणे, योग्य स्किनकेअर रूटीन फॉलो करणे, आणि नियमितपणे सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.

(THIP Media या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com