Fact Check : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला? व्हायरल व्हिडिओमागे हे आहे सत्य

Shivaji maharaj statue in prayagraj viral video : प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे असा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमागे नेमके काय सत्य आहे जाणून घेऊया सविस्तर.
Shivaji maharaj statue in prayagraj viral video
Shivaji maharaj statue in prayagraj viral videoesakal
Updated on: 

Created By : Vishwas News

Translated By: Sakal Digital Team


उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि रस्त्याच्या कडेला सजावट दिसत होती. काही लोकांनी या व्हिडिओद्वारे दावा केला की, प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा बसवण्यात आला आहे.

पोस्टमधील दावा कोणता?
व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जात होता की, प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाकाय पुतळा बसवण्यात आला आहे आणि कुंभमेळ्याच्या तयारीत हे काम सुरू आहे. व्हायरल पोस्टमधील मजकूर येथे जसाच्या तसा लिहिला आहे. दुसरे वापरकर्तेही हा व्हिडिओ खरा समजून शेअर करत आहेत. व्हायरल पोस्टचे Archieve इथे पाहा.

esakal

तथ्य पडताळणीत काय आढळले?
तपासात हे लक्षात आले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. या व्हिडिओमध्ये वापरलेला पहिला भाग छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र) चा होता, आणि सजावटीचा भाग प्रयागराजमधील बालसन चौकाचा आहे. म्हणजेच, व्हायरल व्हिडिओमधील पुतळा छत्रपती शिवाजी महाराजाचा छत्रपती संभाजी नगरमधील आहे, आणि प्रयागराजमध्ये हा पुतळा बसवलेला नाही.

पुरावा १

व्हायरल व्हिडिओमधील पहिला भाग छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकातील आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. हा व्हिडिओ २० डिसेंबर २०२४ रोजी इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता.

पुरावा २

गुगल लेन्स टूलचा वापर करून व्हिडिओतील ठिकाणाची पडताळणी केली. छत्रपती संभाजी नगरमधील रस्ता, प्रतिमा आणि दिवे हे व्हिडिओतील सीनशी जुळतात. येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सापडली. व्हायरल व्हिडिओ आणि गुगल मॅपमध्ये दिसणारा रस्ता, प्रतिमा आणि दिवे एकसारखेच आहेत. यावरून हे स्पष्ट झाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजी नगरमधील आहे.

esakal

पुरावा ३

दुसऱ्या भागातील सजावटीचा व्हिडिओ प्रयागराजमधील बालसन चौकाचा असल्याचे आढळले. streets.of.prayagra नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर सजावटीचा एक व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ ६ ऑगस्ट २०२४ रोजी इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. यूट्यूब चॅनलवर सापडलेल्या सजावटीच्या व्हिडिओमध्ये प्रयागराजमधील बालसन चौक दर्शवला गेला.

पुरावा ५

प्रयागराज येथील दैनिक जागरणच्या संपादकीय प्रभारी राकेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पोस्ट बनावट आहे.

निष्कर्ष
विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळले की, प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओतील पुतळा छत्रपती संभाजी नगरमधील क्रांती चौकातील आहे, आणि प्रयागराजमधील सजावट मात्र वेगळी आहे. त्यामुळे, या व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा खोटा ठरला आहे.

(Vishwas News या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com