Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Lal Krishna Advani: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Fake News About Lal Krishna Advani On Rahul Gandhi
Fake News About Lal Krishna Advani On Rahul GandhiEsakal

Created By: Vishwas News

Translated By: Sakal Digital Team

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अडवाणींनी राहुल गांधींना भारतीय राजकारणातील हिरो म्हणून वर्णन केल्याचा दावा केला जात आहे.

विश्वास न्यूजने याबाबत तपास केल्यानंतर आढळले की, अडवाणींनी राहुल गांधींना भारतीय राजकारणाचा हिरो म्हटलेले नाही. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने खोटे दावे केले जात आहेत.

दावा

फेसबुकवर शैलेंद्र कुमार सेन I नावाच्या पेजवर 8 मे रोजी अडवाणींचे छायाचित्र पोस्ट केरत लिहिले आहे की,

“राहुल गांधी हे भारतीय राजकारणाचे हिरो: लालकृष्ण अडवाणी

(avadhbhoomi.com)

7 मे. 2024.

देशाचे माजी गृहमंत्री, भारतरत्न श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अडवाणी म्हणाले आहेत की, मी भाजपचा असलो तरी आज भारताचा एक समाजसेवक म्हणून मला भारतीय जनतेला सांगायचे आहे की, राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती आहेत जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. भारतातील नागरिकांना नवी दिशा देणारे निर्णय घेऊ शकतात. गृहमंत्री म्हणूनही मी देशाची सेवा केली आहे. पण राहुल गांधींसारखा प्रभावशाली नेता मी राजकारणात पाहिला नाही.

आज निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना लालकृष्ण अडवाणी यांचे वक्तव्य आले आहे. त्यांचे हे विधानही महत्त्वाचे मानले जात आहे. कारण नुकतेच त्यांना मोदी सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे, अशा परिस्थितीत राहुल गांधींचे कौतुक करून लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

'फेसबुक'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Lal Krishna Advani Fake Post About Rahul Gandhi
Lal Krishna Advani Fake Post About Rahul GandhiEsakak
Lal Krishna Advani Fake Cliam About Rahul Gandhi
Lal Krishna Advani Fake Cliam About Rahul GandhiEsakal

सत्य

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, विश्वास न्यूजने Google वर कीवर्ड वापरून त्याबद्दल शोध घेतला. तेव्हा त्यांना कोणत्याही विश्वसनीय मीडिया वेबसाइटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही जी व्हायरल दाव्याची पुष्टी करू शकेल.

यानंतर विश्वास न्यूजने अवधभूमी नावाचे पोर्टल पाहिले. तेव्हा आढळले 8 मे रोजी हे वृत्त प्रसिद्ध करून हा दावा करण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे की, “माजी गृहमंत्री भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की ते भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात, कारण त्यांच्यात देशवासियांना नवी दिशा देणारे निर्णय घेण्याची क्षमता आहे. राहुल गांधींसारखा प्रभावशाली नेता त्यांनी राजकारणात पाहिला नाही." अडवाणींचे हे विधान निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यादरम्यान आले आहे.

Fake Claim Of Lal Krishna Advani On Rahul Gandhi
Fake Claim Of Lal Krishna Advani On Rahul GandhiEsakal
Fake News About Lal Krishna Advani On Rahul Gandhi
Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल
Disclaimers For avadhbhumi Website
Disclaimers For avadhbhumi WebsiteEsakal

अवधभूमी पोर्टलवर विश्वास न्यूजवर एक डिसक्लेमर विभाग सापडला. त्यात लिहिले आहे, “या वेबसाइटवरील सर्व माहिती सद्भावनेने आणि केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केली आहे. Avadhbhumi.com या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत ​​नाही. या वेबसाइटवर सापडलेल्या माहितीवर तुम्ही केलेली कोणतीही कृती पूर्णपणे तुमच्या स्वत:च्या जोखमीवर आहे. Avadhbhumi.com वेबसाइटच्या वापराशी संबंधित कोणत्याही नुकसान आणि/किंवा हानीसाठी जबाबदार राहणार नाही.”

Fake News About Lal Krishna Advani On Rahul Gandhi
Fact Check: ब्राझीलमधील पोलीस कारवाईचा व्हिडिओ, श्रीनगरमधील दहशतवाद्याच्या अटकेचा असल्याचे सांगत व्हायरल

निष्कर्ष

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव वापरुन खोटा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी राहुल गांधींचे 'भारतीय राजकारणाचे हिरो' असे वर्णन केलेले नाही.

'विश्वास न्यूज' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com