Fact Check: मुस्लिम मतदारांबद्दल चुकीच्या संदर्भासह 2022 चा फोटो व्हायरल

Loksabha Election 2024: राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत आहेत. यामध्ये काही दावे खरे आहेत तर काही दावे अर्धसत्य आणि खोटे असल्याचे अनेकदा समोर येत असते.
Muslim Voters Fact Check
Muslim Voters Fact CheckSocial Media

Created By: द क्विंट

Translated By : सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशात राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत आहेत. यामध्ये काही दावे खरे आहेत तर काही दावे अर्धसत्य आणि खोटे असल्याचे अनेकदा समोर येत असते.

यंदा देशात लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला झाले. दरम्यान 19 एप्रिलच्या मतदानाचा संदर्भ देत एक फेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा संदर्भ देत एका युजरने एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये युजरने लिहिले आहे, "हिंदू लोक घरी निवांत बसले आहे. आणि 'ते' त्यांच्या लोकांना सत्तेत आणण्यासाठी उत्साहीत आहेत."

या पोस्टमध्ये युजरने वापरलेल्या फोटोमध्ये एका मतदान केंद्रामध्ये बुरखाधारी महिला मतदानासाठी उभ्या असल्याचे दिसत आहे.

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

X Post
X PostEsakal
Muslim Voters Fact Check
Fact Check: ममता बॅनर्जी यांचं खरं नाव मुमताज खातून नाही! व्हायरल होत असलेला दावा खोटा

सत्य

दरम्यान द क्विंट या संकेतस्थळाने या पोस्टसंबंधी तथ्थ्य तपासले. त्यामध्ये आढळले की हा फोटो 2022 मध्ये वाराणसीत काढलेला आहे. आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही.

Google वर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर रॉयटर्सने प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली ज्यामध्ये एक्स पोस्टमध्ये दावा करताना वापरेला फोटो आहे.

रॉयटर्सने प्रसिद्ध केलेली बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Original News
Original News

रॉयटर्सने 7 मार्च 2022 रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीसाठी वापरलेल्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्य विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदार वाराणसीमध्ये मतदान करण्यासाठी रांगेत उभे आहेत.

रॉयटर्स या बातमीवरुन सिद्ध होते की, या फोटोचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.

Muslim Voters Fact Check
Fact Check: राहुल गांधींनी तरुणांना एक-एक लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं नाही! दिशाभूल करणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

निष्कर्ष

द क्विंटने केलेल्या तथ्य तपासणीतून असे पुढे आले की, एक्सवर पोस्ट केलेला फोटो प्रथम 2022 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे एक्स युजरने केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.

'द क्विंट' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com