Pankaj Tripathi Fact checkesakal
व्हायरल-सत्य
Fact Check : पंकज त्रिपाठी यांनी जाहिरातीत भाजपविरोधात प्रचार केला नाही. तो 'व्हिडीओ' एडिट केलेला
Pankaj Tripathi Edited Video shared by AAP: नोव्हेंबर २०२३ मध्ये, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पंकज त्रिपाठी यांची "UPI सुरक्षा दूत" म्हणून नियुक्ती केली. मूळ व्हिडिओ या मोहिमेचा एक भाग असून त्यात भाजपचा अजिबात उल्लेख नाही.
Created By: India Today
Translated by: Sakal Digital Team
मुंबई :
आम आदमी पक्षाने केलेल्या व्हिडिओमध्ये काय?
दिल्लीमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्या व्हिडिओमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी हा भाजपविरोधी प्रचार करताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ एडिट केलेला असून पंकज त्रिपाठी यांनी केलेल्या एका जाहिरातीचा हा एडिट केलेला व्हिडीओ आहे.
