
Created By : The Quint
Translated By: Sakal Digital Team
गायिका नेहा कक्करला पोलिसांनी अटक केली आहे आणि तिचा ‘एमरलाडो’ नावाच्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मशी संबंध असल्याचा दावा काही फोटोंसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कक्करची कपिल शर्मासोबतची खोटी मुलाखत आणि तिच्या कारकिर्दीचा अंत झाल्याचेही म्हटले जात आहे.
आम्ही व्हायरल पोस्टमधील लिंक तपासली. ती लिंक एका फसव्या वेबसाइटकडे वळवते ज्याचा इंडियन एक्सप्रेसशी कोणताही संबंध नाही.
वेबसाइटचा URL live.indiatimestoday1.top आहे, जो इंडियन एक्सप्रेस वेबसाईटचे अधिकृत यूआरएल नाही.
गुगल सर्चवर नेहा कक्कर अटक यावर शोध घेतल्यावर कोणतीही विश्वासार्ह बातमी सापडली नाही. नेहा कक्करच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरही यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
व्हायरल वेबसाइटवर कक्कर आणि कपिल शर्माची मुलाखत दाखवली गेली आहे, पण कपिलच्या अधिकृत चॅनेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती उपलब्ध नाही. नेहा कक्करनेही 'एमरलाडो'बद्दल कोणतेही प्रमोशन केलेले आढळले नाही.
निष्कर्ष
नेहा कक्करला अटक झाल्याचा दावा आणि 'एमरलाडो'शी तिचा संबंध असल्याची माहिती पूर्णतः खोटी आहे. फेक न्यूज वेबसाइट आणि बदललेल्या फोटोंच्या आधारे वाचकांची दिशाभूल केली जात आहे. सोशल मीडियावरील अशा फसव्या पोस्टपासून सावध राहा.
(The Quint या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.