

Created By : PTI
Translated By: Sakal Digital Team
Fact Check: 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्याची प्रयागराजमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका महामार्गाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करून महाकुंभच्या तयारीचा भाग म्हणून प्रयागराजमध्ये ही मूर्ती बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.