Fact Check : दिल्लीत भाजपच्या विजयानंतर यमुना आरती सुरू झाल्याचा दावा खोटा, व्हायरल व्हिडिओमागे हे आहे सत्य

Yamuna Aarti after BJP's victory Delhi Elections : दिल्लीतील वासुदेव घाटावर यमुना आरती सुरू झाल्याचा दावा खोटा आहे. मार्च २०२४ पासून नियमितपणे होणारी ही आरती भाजपच्या विजयाशी संबंधित नाही.
fact check Yamuna Aarti after BJP's victory Delhi Elections
fact check Yamuna Aarti after BJP's victory Delhi Electionsesakal
Updated on

Created By : Boom

Translated By: Sakal Digital Team

दिल्लीतील वासुदेव घाटावर यमुना आरती सुरू झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात येत आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर यमुना घाटावर आरती सुरू करण्यात आली आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दिल्ली पुन्हा एकदा 'इंद्रप्रस्थ'च्या दिशेने जात असल्याचा दावा केला जात आहे आणि यमुना आरती सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

पोस्टमधील दावा कोणता?

एका फेसबुक युजरने शेअर केलेल्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की, दिल्लीतील भाजप सरकार सत्तेत येताच काश्मिरी गेट येथील यमुना घाटावर आरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या यमुना रिव्हरफ्रंटच्या संकल्पाचे पूर्ततेसाठी हे केल्याचे सांगितले जात आहे. ही पोस्ट x (पूर्वीचे ट्वीटर) वर देखील शेअर करण्यात आली आहे. एनडीटीव्ही इंडिया आणि एबीपी न्यूजनेही यमुना घाटावर आरती सुरू झाल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ पोस्टचे Archieve इथे आणि इथे पाहा)

तथ्य पडताळणीत काय आढळले?

यमुना आरती दिल्लीमध्ये १२ मार्च २०२४ पासून वासुदेव घाटावर सुरू झाली आहे, जी दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) विकसित केले आहे. यमुना आरती भाजपच्या विजयाशी संबंधित नाही. वासुदेव घाटावर यमुना आरती मंगळवार आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता केली जात आहे. या आरतीचे आयोजन एका नोंदणीकृत संस्थेकडून केले जात आहे.

पुरावा 1

१२ मार्च २०२४ पासून वासुदेव घाटावर नियमितपणे यमुना आरती सुरू झाली आहे, हे दिल्लीच्या उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी उद्घाटनानंतर निश्चित केले आहे. दैनिक जागरण आणि न्यूज २४ च्या वृत्तानुसार ही समोर आली.

पुरावा 2

वासुदेव घाटावर यमुना आरतीचा आयोजन दिल्ली विकास प्राधिकरणाने केलेल्या सुशोभीकरणानंतर सुरू झाला आहे आणि भाजपच्या विजयाशी त्याचा काहीही संबंध नाही. या संदर्भात, आम्हाला ट्विटरवर दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांचे एक ट्विट देखील आढळले.

पुरावा 3

यासंदर्भात, ट्विटरवर आणि गुगल मॅप्सवर वासुदेव घाटावर होणाऱ्या यमुना आरतीचे पुरावे सापडले आहेत. व्हायरल व्हिडिओ आणि गुगल मॅप्सवरील व्हिडिओमध्ये वासुदेव घाटावर होणारी आरती स्पष्टपणे दिसते.

esakal

पुरावा 4

यमुना आरतीचा इतिहास २०१५ मध्ये गीता घाटावरही झाला होता, जेव्हा अरविंद केजरीवाल आणि अन्य दिल्लीतील नेत्यांनी सामूहिक आरती केली होती.या यमुना आरतीचे दृश्य १३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रसारित झालेल्या इंडिया टीव्हीच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये पाहता येतील .

पुरावा 5

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार , 'वासुदेव घाट हा दिल्ली विकास प्राधिकरणाने विकसित केलेला शहरातील पहिला घाट आहे. येथे २००० हून अधिक झाडे आहेत. या १४५ मीटर लांबीच्या घाटाला तीन प्रवेशद्वार आहेत. घाटावर यमुना मातेची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. वासुदेव घाटावरील आरतीचे आयोजन आणि देखभाल करण्याचे काम एका नोंदणीकृत संस्थेकडून केले जात आहे.

निष्कर्ष

व्हायरल होणारा दावा खोटा आहे. यमुना आरती दिल्लीतील भाजपच्या विजयाशी संबंधित नाही. वासुदेव घाटावर नियमित यमुना आरती मार्च २०२४ पासून सुरू झाली आहे, आणि हे दिल्ली विकास प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत करण्यात आले आहे.

(Boom या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com