Created By : PTI Fact Check Desk
Translated and Edited By: Sakal Digital Team
नवी दिल्ली: काही सोशल मीडिया पेजेसवर एका माध्यमाचा दाखला देत स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला असून या स्क्रिनशॉटमध्ये असा दावा केला आहे की, इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांनी तरुण मुलामुलींनी मर्यादित संवाद साधावा म्हणजे थोडक्यात कमी बोलावं अशा वाक्याची पाठराखण केली आहे. मात्र 'पीटीआय फॅक्ट चेक डेस्क' च्या तपासणीत असे आढळून आले की स्क्रीनशॉट खोटा आहे आणि असा कोणताही लेख हिंदुस्तान टाइम्सने प्रकाशित केलेला नाही. तसेच मूर्ती यांनी अशी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. या सोशल मीडिया पोस्ट खोटा दावा करून शेअर करण्यात आल्या होत्या.