Created By : Aaj Tak
Translated By: Sakal Digital Team
मुंबई: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाच्या पहिल्या अमृत स्नानाच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारीला साडेतीन कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले आणि पहिल्या दोन दिवसांतच स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५ कोटी झाली आहे.
एक फोटो शेअर करताना काही सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत की, महाकुंभला आलेल्या या करोडो लोकांमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचेही नाव आहे. फोटोमध्ये अखिलेश पाण्यात उभे आहेत आणि त्यांच्याकडे पाहून फोटो क्लिक होण्यापूर्वीच त्यांनी डुबकी मारल्याचे दिसते.
फेसबुकवर फोटो शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले की, “सपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव यांनी सनातनी हिंदूंना सडेतोड उत्तर देताना कुंभमध्ये स्नान केले आहे.