Asiatic Lion Viral Video : सिंहाचा पाठलाग का केला गेला? सफारी पार्कमधल्या 'त्या' व्हायरल व्हिडिओमागचं खरं कारण आलं समोर; तिघांना कामावरून काढलं

Gujarat Ambardi Safari Park : अमरेलीतील अंबर्डी सफारी पार्कात 'सिंबा' सिंहाचा दुचाकीवरून पाठलाग; वन विभागाच्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई
Forest department takes action and sacks 3 contractual workers.

Forest department takes action and sacks 3 contractual workers.

Sakal

Updated on: 

अमरेली (गुजरात): गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील अंबर्डी सफारी पार्कमध्ये (Ambardi Safari Park) आशियाई सिंहाचा दुचाकीवरून पाठलाग केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, वन विभागाने याची गंभीर दखल घेत तीन कंत्राटी (Outsourced) वन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Loading content, please wait...