Created By : आज तक
Translated By: Sakal Digital Team
मुंबई: 'स्प्रिंग इफेक्ट' चा इफेक्ट पाकिस्तानमध्ये देखील सुरु झाला आहे..? हा व्हिडीओ इस्लामाबादचा आहे. अशा आशयाचा व्हिडीओ सध्या शोधलं मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला पायवाटेवर एक बुरखा घातलेली महिला चालताना दिसत आहे. बुरखा उडत असल्यामुळे तिचे संपूर्ण पाय दिसत आहेत.
या दाव्यात अप्रत्यक्षपणे हे सांगितले आहे की, इस्लामाबादमधील या महिलेने बुरख्याला विरोध म्हणून जाणूनबुजून असे कपडे घातले आहेत. एका एक्स यूझरने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "स्प्रिंग इफेक्टचा परिणाम आता पाकिस्तानमध्येही दिसत आहे. हा इस्लामाबादचा व्हिडिओ आहे."
व्हायरल पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहू शकता.