esakal | 'भाई ये करोडों के मालिक है'! मुंबईतील तीन श्रीमंत भिकाऱ्यांची कथा
sakal

बोलून बातमी शोधा

beggar.jpg

मुंबईत असे काही भिकारी आहेत जे वर्षानुवर्ष सिग्नल, लोकलमध्ये भीक मागून आज करोडो रुपयांचे मालक झाले आहेत.

'भाई ये करोडों के मालिक है'! मुंबईतील तीन श्रीमंत भिकाऱ्यांची कथा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मोठी स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार साऱ्यांनाच आहे. त्यामुळे गावखेड्यातील अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठतात. मुंबई मायानगरीत आल्यावर अनेक जण या धावत्या शहराबरोबर धावू लागतात. तर काही जण या रहदारीत हरवून जातात. त्यामुळेच आज मुंबईच्या रस्त्यावर अनेक गोरगरीब भीक मागतांना दिसतात. अनेकदा लोकल, सिग्नल अशा ठिकाणी लहान मुलांपासून ते स्त्रियांपर्यंत भिकारी भीक मागतांना दिसतात. त्यामुळे भिकारी म्हटलं की अनेक जण त्यांच्याकडे पाहून नाक मुरडतात. त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. मात्र, लोकांची अवलेहना सहन करत हे लोक पोटापाण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्याकडे हात पसरत २-४ रुपयांची मागणी करतात. विशेष म्हणजे मुंबईत असे काही भिकारी आहेत जे वर्षानुवर्ष सिग्नल, लोकलमध्ये भीक मागून आज करोडो रुपयांचे मालक झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील श्रीमंत भिकारी कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत. भिकारी म्हटलं की त्यांच्याकडे कुठून आलाय पैसा आणि कुठून आलीये लक्झरी लाइफस्टाइल असा कुत्सिक प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र, मुंबईतील असे काही भिकारी आहेत. जे साध्या वेशात नागरिकांसमोर जाऊन भीक मागतात अन् प्रत्यक्षात मात्र टोलेजंग इमारतीत राहतात. विशेष म्हणजे दारोदार भीक मागणारे हे भिकारी परेल, चर्नी रोड, गोवंडी अशा ठिकाणी राहत असल्याचं 'झी न्यूज. इंडिया'च्या वृत्तात नमूद केलं आहे.

१. भरत जैन -
मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांमध्ये ज्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं ते म्हणजे भरत जैन.  भरत जैन हे मुंबईतील परेल या गजबजलेल्या ठिकाणी राहत असून ते देशातील सर्वात श्रीमंत भिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. भरत जैन यांचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घरांची किंमत जवळपास ७० लाखांपेक्षा अधिक आहे. भरत हे परेल सोडून अन्य ठिकाणीदेखील भिक मागतात. त्यामुळे जवळपास ७,५००० रुपये दर महिना त्यांची कमाई आहे.

२. गीता -
चर्नी रोड येथे राहणाऱ्या गीता यादेखील दररोज भीक मागून उदरनिर्वाह करतात. विशेष म्हणजे आज त्यांचं मुंबईत स्वत:चं हक्काचं घर आहे. गीता दिवसाला १५०० रुपये कमावतात. त्यामुळे त्यांची महिन्याभराची कमाईदेखील ५० हजारच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं.

३. चंद्र प्रकाश आझाद -
मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणारे चंद्र प्रकाश आझाद हेदेखील मुंबईतील श्रीमंत भिकाऱ्यांपैकी एक होते. २०१९ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांची लाखोंची संपत्ती असल्याचं समोर आलं होतं.

४. पप्पू कुमार -
पटना येथे राहणारे पप्पू कुमार हेदेखील श्रीमंत भिकाऱ्यांपैकी एक आहेत. पप्पू कूमार यांची संपत्ती जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे पप्पू कुमार यांची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेतात.

५. लक्ष्मी -
कोलकात्ता येथे राहणाऱ्या लक्ष्मी या वयाच्या १६ व्या वर्षापासून भीक मागत आहेत.  १९६४ पासून त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे भीक मागून त्यांनी लाखोंची संपत्ती कमावली आहे. त्या महिन्याला जवळपास ३०  हजारांच्या आसपास पैसे कमावतात.


 

loading image