Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

आसामच्या करीमगंज या भागात मतदान सुरु असताना एकाच व्यक्तीकडून भाजपाला पाच वेळा मतदान केले जात असलेला व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे
asam five time voting viral video
asam five time voting viral video Esakal

Created By: न्यूज चेकर

Translated By : सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आसामच्या करीमगंज या भागात मतदान सुरु असताना एकाच व्यक्तीकडून भाजपाला पाच वेळा मतदान केले जात असलेला व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील एकाच व्यक्ती पाच वेळा भाजपलाच मतदान करत असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असून ही व्यक्ती 'पोलिंग एजंट' आहे. परंतु त्याने याचा व्हिडीओ शूट करून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र तपासणीअंती हा व्हिडीओ प्रत्यक्ष मतदानाच्या वेळचा नसल्याचे समोर आले आहे.

दावा काय केला होता?

मनीषा चौबे या 'एक्स युजर' ने पोस्ट करत थेट भारताच्या निवडणूक आयोगालाच पोस्ट टॅग करत प्रश्न विचारला. त्यांनी लिहिले की,

"बघा, ईव्हीएम बटन खटाखट दाबून भाजपाला जिंकून दिलं जातंय का?

हे सगळं काय होतंय हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करायला हवं

शायरी करणाऱ्या त्या मुख्य निवडणूक आयुक्तांना मी विचारू इच्छिते की, अशा प्रकारे ते भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळवून देणार आहात का? "

Archive version

तथ्य तपासणीत काय आढळले?

पुरावा १

न्यूज चेकरने प्रथम Google वर “voting fraud”, “Votes for BJP candidate by the same person” या कीवर्डसह सर्च केले. त्यावर त्यांना २८ एप्रिल २०२४ रोजी न्यूज ९ ने प्रकाशित केलेला अहवाल सापडला. हा व्हिडिओ आसाममधील करीमगंज येथील असल्याचे अहवालात म्हटले आहे, जो 'मॉक पोल' दरम्यान व्हिडिओ शूट करण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी (DEO) मतदान अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

पुरावा २

आणखीन संबंधित कीवर्ड शोधताना, २८ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा आयुक्त, करीमगंज यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केलेली पोस्ट सापडली. या पोस्टमध्ये व्हायरल व्हिडिओबाबत करीमगंजच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले प्रसिद्धी पत्रक आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार “व्हायरल व्हिडिओच्या परीक्षणादरम्यान, मतदान अधिकारी नजरुल हक यांनी सांगितले की, हा व्हिडिओ 'मॉक पोल' दरम्यान घेण्यात आला होता आणि नंतर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी सीआरसी (क्लोज रिझल्ट क्लिअर्ड) होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींच्या वक्तव्यावरूनही देखील याबाबतची स्पष्टता येते.

निवडणुकीतील प्रक्रियेनुसार, पोलिंग एजंटला मॉक पोल दरम्यान उमेदवाराच्या बाजूने काही मते देऊन पाहण्याची परवानगी आहे. या एकूणच प्रकाराबाबत मतदान अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पुरावा ३

२८ एप्रिल २०२४ लाच जिल्हा आयुक्तांद्वारे देखील प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले होते. ज्यातही की व्हायरल व्हिडिओ केवळ मॉक पोल दरम्यान घेण्यात आला होता आणि तो प्रत्यक्ष मतदानाशी संबंधित नाही. या कालावधीत कोणत्याही प्रक्रियेचे उल्लंघन झाले नाही.

भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल, मतदान अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई आधीच केली गेली आहे आणि मतदान केंद्रात मोबाईल फोन न नेण्याच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिंग एजंटवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. या घटनांचे वार्तांकन याठिकाणी आणि याही ठिकाणी तुम्ही वाचू शकाल.

पुरावा ४

माध्यमांमधील वृत्तानुसार अपक्ष उमेदवार अब्दुल हमीद, ज्यांचा पोलिंग एजंट व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने या घटनेसाठी मतदान अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. अब्दुल हमीद यांच्या म्हणण्यानुसार, मतदान अधिकारी नाश्त्याला गेले असता त्यांनी ईव्हीएम तसेच सोडले होते.

हमीदने ईटीव्ही भारतला सांगितले की, "निवडणुका सुरू होण्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता त्यांनी गंमत म्हणून मनोरंजनासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडीओ शुक्रवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करतो.

भारताच्या निवडणूक आयोगाने देखील एक्स वर पोस्ट करत हा व्हिडीओ खोटा दावा करून पसरवला जात असल्याचे सांगितले आहे. तसेच निवडणूक आयोगावर लावण्यात आलेले आरोप खोटे आणि संभ्रम निर्माण करणारे असल्याचे सांगण्यात आले आहे.

निष्कर्ष

या सर्व पुराव्यांवरून एका व्यक्तीने भाजप उमेदवाराला मतदानात सलग पाच मते दिल्याचा दावा हा खोटा असल्याचे न्यूज चेकरच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ 'मॉक पोल' चा (प्रत्यक्ष मतदानापूर्वीचा) आहे.

'न्यूज चेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com