Viral : उंदराची कृपा! तो होता म्हणून बरं, नाहीतर आख्खं कुटुंब संपलं असंत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral : उंदराची कृपा! तो होता म्हणून बरं, नाहीतर आख्खं कुटुंब संपलं असंत!

Viral : उंदराची कृपा! तो होता म्हणून बरं, नाहीतर आख्खं कुटुंब संपलं असंत!

कधीकधी आपल्यावर येणारे संकट अगदी लिलया बाजूला पडते. एखादी दैवी शक्ती आपल्या पाठीशी राहून त्यातून आपले रक्षण करते. तेव्हा देवाचा चमत्कार झाला अशी भावना दृढ होते. असाच काहीसा अनुभव एका कुटुंबाला आला आहे. त्यांच्यावर येणाऱ्या संकटाची चाहुलही नसताना एका उंदराने त्यांचा जीव वाचवला आहे.

बुडणाऱ्याला काडीचा आधार, या उक्तीप्रमाणेच राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील सिक्रोडा गावातील एका कुटुंबासाठी छोटा उंदीर देवदूत म्हणून आला. या कुटुंबातील सर्वचजण गाढ झोपेत असताना एका पिटुकल्या उंदराने त्यांची झोप मोड केली. त्यांच्या जवळ जाऊन आवाज केला. सर्व सदस्य उठत नाहीतर तोवर त्यांच्या अंगावर उड्या मारू लागला.

उंदीर झोप मोड करतोय म्हटल्यावर सर्वचजण चिडून त्याला शोधू लागले. पण. जेव्हा या उंदराच्या या कृत्यामागील कारण समजले तेव्हा हेच सदस्य त्याचे आभार मानू लागले. कारण, उंदराने या लोकांची झोपमोड केली आणि तो बाहेर पळाला. तोवर काहीतरी वाईट घडणार आहे असे जाणवल्याने सर्वलोक बाहेर येताच घराचा एक हिस्सा धाडकन कोसळला. कोणाला काही कळायच्या आतच घर जमिनदोस्त झाले.

राजखेडा परिसरातील सिक्रोडा गावात या कुटुंबात राहणारे सदस्य जयप्रकाश, निहाल सिंग, इंदिरा, बबिता आणि घरात झोपलेले नातेवाईक नथिलाल पुरैनी यांचे एका उंदरामूळे प्राण वाचले.

या घराचे प्रमुख जयप्रकाश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचे कुटुंबीय आणि घरी आलेले नातेवाईक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले होते. तेव्हा अचानक एक उंदीर उडी मारून त्याच्यावर पडला. त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचवेळी काहीतरी भुकंपासारखा आवाज जाणवला. तेव्हा घाबरून त्यांनी इतर सदस्यांना उठवले आणि सर्वांचे प्राण वाचवले.

आम्ही सर्व आवाज ऐकून बाहेर आलो आणि अंगणात बांधलेली जनावरांनाही बाहेर काढले. तोवर संपूर्ण घर जमिनदोस्त झाले होते. तो उंदीरच माझ्या व कुटुंबासाठी देवदुत बनून आला, असे जयप्रकाश म्हणाले.