
Created By : Boom Live Fact check
Translated By: Sakal Digital Team
मुंबई : जगातील महान तबला वादक अशी ख्याती मिळवणारे उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उस्ताद झाकीर हुसेन यांचा पाकिस्तानी तालवादकासोबतच्या जुगलंबदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत तबला वाजवणारी ही व्यक्ती झाकीर हुसैन असल्याचा दावा केला जात आहे.
बूम फॅक्ट चेकने केलेल्या पडताळणीत असे आढळून आले की व्हायरल दावा खोटा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत तबलावादक उस्ताद तारी खान आहेत.