
माळशिरस : काळ्याभोर ढगांची झालर... टाळ मृदंगाचा गजर... माउलीनामाचा जयघोष... लाखो भाविकांच्या नजरा... अश्वांची नेत्रदीपक दौड... अशा भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे रंगले. माउलींच्या अश्वांनी तीन फेऱ्या मारून रिंगण पूर्ण केले. रिंगणातील आनंदोत्सवात न्हालेल्या लाखो वैष्णवांमध्ये चैतन्य बहरले.