
अकलूज : भक्तीचा अतूट प्रवाह मंगळवारी दुथडी भरून वाहणाऱ्या नीरा नदीच्या तीरावर अनुभवायला मिळाला. सूर्योदयावेळी संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांना पुणे जिल्ह्यातील सराटी येथे नीरा नदीत स्नान घालण्यात आले. यावेळी पालखीमार्गावर फुलांच्या आणि रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर अकलूज येथील रिंगणात प्रेमभक्तीचा अखंड झरा वाहताना दिसला आणि दुपारी सोहळा विसावला.