Ashadhi Wari : आळंदीतील वातावरण भक्तिमय

आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी परंपरेने भाविकांचे आगमन आळंदीत होऊ लागले आहे.
Alandi
AlandiSakal
Updated on
Summary

आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी परंपरेने भाविकांचे आगमन आळंदीत होऊ लागले आहे.

आळंदी - आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी परंपरेने भाविकांचे आगमन आळंदीत होऊ लागले आहे. एकीकडे प्रशासनाची भाविक वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची लगबग, तर दुसरीकडे वारकऱ्यांचा धर्मशाळांमधून हरिनामाचा गजर सुरू झाल्याने आळंदीत वातावरण भक्तीमय झाले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २१) होत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होईल. दरम्यान परंपरेने घराण्यात चालत आलेली वारी माऊलीचरणी रुजू करण्यासाठी राज्यभरातून भाविक येवू लागले आहेत. खास करून मराठवाड्यातील भाविकांची उपस्थिती जाणवत आहे. गोपाळपुरा, वडगाव रस्ता, दत्त मंदिर रस्ता या भागात धर्मशाळांमधून भाविकांचा मुक्काम दिसून येत आहे. सिद्धबेटातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. ठिकठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ करताना भाविक दिसत आहेत. भाविकांच्या आगमनाने आळंदीत वातावरण भक्तीमय होण्यास सुरवात झाली. आळंदीत आल्यावर धर्मशाळांची सफाई, वारीसाठी तंबूचे साहित्य, शिधा खरेदी करण्याची लगबग दिंडीचालक करत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्याची प्रशासनाची लगबग दिसून येत आहे. पालिका, महसूल खात्याबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त लक्षणीय आहे. गुरुवारपासून (ता. १६) होमगार्ड आणि पोलिस बंदोबस्तासाठी रुजू होत आहेत. दरम्यान, संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी शहरात दोनशे दहा सिसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तर, वारकऱ्यांना आणि पोलिसांना दक्षतेबाबतच्या सूचना, तसेच हरविलेल्या व्यक्तींच्या शोध घेण्यासाठी पब्लिक अनांऊसिंग सिस्टीमसाठी ५८ ध्वनिक्षेपक लावले आहेत.

कडेकोट बंदोबस्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पायी वारीस परवानगी असल्याने भाविकांची मोठी गर्दीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा बंदोबस्तही मोठा आहे. दोन उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त, 82 पोलिस निरिक्षक, एकशे ऐंशी पोलिस उपनिरीक्षक, अकराशे पोलिस अंमलदार, दोनशे वाहतूक पोलिस , पस्तीस वॉर्डन, सहाशे होमगार्ड, एसआरपीएफ, एनडीआरएफचे पथक, अशा पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. होमगार्ड आणि पोलिसांची गर्दी जाणवू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jejuri Palkhi Accident Sant Tukaram Maharaj Palkhi Route Heavy Vehicles Pune Solapur Highway Warkari Safety Pune Traffic Police Traffic Management Latest News Maharashtra
The Jejuri Wari Accident prompted an immediate emergency response from Maharashtra's health department to treat injured Warkaris.
Ashadhi Ekadashi 2025
Ashadi Ekadashi 2025
Marathi News Esakal
www.esakal.com