तुकोबांचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 June 2017

देहू - आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या सावळ्या विठूला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता. १६) देहूतून प्रस्थान ठेवले. त्यात सहभागी होण्यासाठी आणि प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून देहूत आलेल्या लाखो भाविकांनी इंद्रायणीकाठी हरिनामाचा आणि तुकोबा तुकोबाचा जयघोष केला, त्यामुळे अवघी देहूनगरी दुमदुमली. 

टाळ-मृदंगांचा गजर अन्‌ मुखाने ‘ज्ञानोबा- तुकाराम’ नामघोष करणाऱ्या भाविकांनी इंद्रायणीचा काठ फुलून गेला होता. देऊळवाडा परिसरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती. दर्शनासाठी रांगा होत्या. मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. दुपारी पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. प्रस्थान सोहळा देऊळवाड्याबाहेरही पाहता यावा यासाठी हवेली पंचायत समिती सदस्या हेमा काळोखे यांच्यातर्फे दोन ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केली होती. 

आषाढी वारीच्या १८-२० दिवसांच्या वाटचालीत पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी छत्री, प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी देऊळवाड्याबाहेर वारकऱ्यांची झुंबड अष्टगंध, बुक्का खरेदीसाठीही गर्दी होती. मुख्य देऊळवाडा, वैकुंठ गमन स्थान मंदिर, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय रस्ता, गाथा मंदिर परिसरात मुक्कामाला असलेल्या दिंड्यांमध्ये कीर्तने सुरू होती. पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dehu pune news sant tukaram maharaj palkhi sohala