esakal | #SaathChal आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी ‘साथ चल’
sakal

बोलून बातमी शोधा

Saath-Chal

कोण होऊ शकतो सहभागी?  
प्रत्येक टप्प्याच्या वाटचालीत भजनी मंडळे, गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, गृहनिर्माण सोसायट्या, व्यवस्थापन, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंपन्यांचे अधिकारी, कामगार, सेलिब्रिटी, व्यापारी, वकील, उद्योजक, साहित्यिक, कामगार संघटनांचे सदस्य, पदाधिकारी आदींना सहभागी होता येणार आहे.

#SaathChal आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी ‘साथ चल’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात.

त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’तर्फे ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या देखभालीची’ या संकल्पनेतून ‘साथ चल’ उपक्रम २५ व २६ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये आणि २८ जूनला पुण्यात राबविणार आहे. 

आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा २४ जूनला देहू येथून, तर संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा २५ जूनला आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २५ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होईल. त्या वेळी या उपक्रमाचा पहिला टप्पा दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीतील विठ्ठल मंदिर असा असेल. २६ जूनला पहाटे पाचला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होते. त्या दिवशी साथ चलचे सहा टप्पे होतील. पहिला टप्पा पहाटे पाच वाजता सुरू होईल. शेवटच्या टप्प्याचा समारोप फुगेवाडी येथील मेगामार्टजवळ होईल. २८ जूनला सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत पुण्यातील पुलगेट ते हडपसर गाडीतळदरम्यानच्या वाटचालीचे दोन टप्पे असतील. यासाठी आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान, देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.

असे असतील टप्पे
२५ जून : भक्ती-शक्ती निगडी ते आकुर्डी विठ्ठल मंदिर
२६ जून : आकुर्डी विठ्ठल मंदिर ते खंडोबा माळ, खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन, चिंचवड स्टेशन ते मोरवाडी चौक, मोरवाडी चौक ते एचए वसाहत प्रवेशद्वार, एचए प्रवेशद्वार ते नाशिक फाटा आणि नाशिक फाटा ते मेगामार्ट फुगेवाडी.
२८ जून : पुण्यातील पुलगेट बस स्थानक ते भैराबा मंदिर, भैरोबा मंदिर ते लोहिया उद्यान हडपसर.

सहभाग नोंदणीसाठी व्हॉटस्‌ॲप क्रमांक - ७७२१९७४४४७