मनाला भिडणारी वारी : समाजसुधारक दीपस्तंभ

wari
wari

एखाद्याकडे भरपूर असते. मात्र देण्याची दानत किती हा फार मोठा विरेधाभास दाखवणारा भाग असतो. मात्र बरपूर असतानाही लोकांची सेवा करणे, मदतीला धावुन जाणे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जमतील असे नाही.  कशाचीही काळजी न करता प्रत्येक कामात हिरीरीने सहभागी होणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व संत तुकाबारायांचा पालखी सोहळ्यात निमगाव केतकी येथे भेटले. मच्छींद्र उर्फ आप्पा चांदणे त्यांचे नाव. निमगावासह पंचक्रोशीत त्यांनी अनेक मोठी कामे हाती घेतली आहेत.  

वारकऱ्यांची सेवा हा त्यातील एक भाग. भागात सगळ्यांच्या मदतीला ते नेहमीच धावतात. त्यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्याती  माणूसपण बोलमण्यात दिसले, कामातून उमगलेही. त्यांची एका तळावर शंभर एकर बागायत जमीन आहे. सहा भाऊ म्हणजे नात्यांंची विणलेली सोनेरी किनारच. आप्पांचा स्वभाव अत्यंत चांगला.  चळवळी माणूस व सामान्याच्या तळमलीने कामाला उपयोगी पडणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. 1980 च्या आधीपासून त्यांनी गावात अनेक उपक्रम राबवले आहेत. गावोगावी जेवणावळ वारकऱ्यांसाठी सुरू आहे. त्याची सुरवातीची मेढ आप्पांनी लावली. सुरवातीला  घरात व नंतर महाप्रसाद त्यांनी सुरू केला. त्यावेळी वारकऱ्यांची फाटलेली कपडे शिवून देणे, पायाला तेल लावून दुखणारो पाय चेपून देणे, त्यांना तपासण्यासाठी डाॅक्टरांकडून तपासणी करून घेणे अशा अनेक सुविधा 1980 च्या दशकापासून अव्याहतपणे चालू ठेवल्या आहेत. त्यांचे साााजिक कार्य मोठे आहे.

वर्षभर सामाजिक कार्य करता यावे म्हणून त्यांनी अनेक मार्ग निर्माण केले आहेत. तेही अव्याहतपणे सुरू आहेत. व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणारे सर्वात जुने त्यांचा जिल्ह्यात परिचय आहे. त्यांनी आजसअखेर कोणताही डामडौल न करता सर्व प्रकारची मोफत आरोग्य शिबीर घेतली आहेत. ती सुरूही आहेत. मुलामध्ये वक्तृत्व वाढले पाहिजे म्हणून ते भागात त्या स्पर्धा घेतात. प्रती वर्षी साठ बक्षीसे त्यांच्या तर्फे दिली जातात.  तआप्पांनी नृसिंह प्रतिष्ठान स्थापन केले  त्या माध्यमातून ते प्रत्येक वर्षी 150 मुलीना शिक्षणासाठी दत्तक घोतात. त्या मुलींचा पालक म्हणीनही आप्पा ओळखले जातात. सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याची परंपरा घालून देणारा सुधारक म्हणूनही आप्पांची ओळख आहे. त्यांची ही पद्धत चळवळ बनली आहे. ती वाढतेच आहे .शेती व शेतीपुरक व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारा दिलखुलास बागायतदार म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. आप्पा शेती करतात. त्यांना पाच भाऊ आहेत. तेही त्यांच्या उपक्रमात तितक्याच उत्स्फुर्त सहभागी होतात.

अर्थात सावली कधी वेगळी होवू शकत नाहीत. तेसच त्यांचे बंधू आहेत. त्यांचा हार्डवेअर ड्रीप मशीनरीचा व्यवसाय आहे. पाच दहा एकर बागायती जमीन असेल तर काही जमीनदारांचा डामडौल किती असतो. याची जाणीव अलीकडच्या अनेक गुंठा मंत्र्यांमुळे समाजाला दिसतो आहे. अशा स्थितीत आप्पांसारख्या व्यक्ती दिपस्तंभाप्रमाणे नेहमीच आपल्या कामांची ज्योत तेवत ठेवत असतात. वारीचा सोहळा दिवसें दिवस फुलताना.. वाढताना दिसतोय.... वारीच्या वाटेवरील अशी अनेक व्यक्तीमत्व आहेत. ज्यांच्यामुळे जीवनाला वेगळा आदर्श मिळतो आहे. आप्पा सारखा समाजसुधारक म्हणजे गतीमान होणाऱ्या आयुष्यात व वेगवान राहीनामातही दीपस्तंभासारखेच आहेत. आप्पांचे काम कविवर्य रविंद्र नाथांच्या एकेला चलोरे सारखे आहे. काफीला त्यांच्या माग निश्चीत आहे व राहिलही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com