esakal | असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Tukaram Maharaj Palkhi

दिंडीत फिरायला म्हणून आम्ही निघालो. गर्दी म्हणून कारखान्याजवळील गेट जवळ थांबलो. तेथेच पेट्रोलपंपही आहे. त्या पंपाभोवती अनेक प्लस्टीकची खेळणी विकणारी तसेच प्लस्टीकची फुगे वितणारे होते. त्यात एक हजरजबाबी मुलगा होता.

असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)

sakal_logo
By
सचिन शिंदे

तुकोबारायांचा पालखी सोहळा सकाली रिंगणानंतर माळीनगरात सकाळी अकरापर्यंत विसावला. दिंडीत फिरायला म्हणून आम्ही निघालो. गर्दी म्हणून कारखान्याजवळील गेट जवळ थांबलो. तेथेच पेट्रोलपंपही आहे. त्या पंपाभोवती अनेक प्लस्टीकची खेळणी विकणारी तसेच प्लस्टीकची फुगे वितणारे होते. त्यात एक हजरजबाबी मुलगा होता.

हसन त्याच नाव. त्याचे आई, वडील, मोठी बहिणही खेळणी विक्रीसाठी सोहळ्यात आहेत. मात्र त्यांची भेट सोहळ्यात दर्शन संपल्यानंतर मध्यरात्रीच होत असते. तीही दिवसात एकदाच. लमाणी तांडे किंवा अन्य समाजातील ती कुटूंब आहेत. हे त्यांच्या भाषेवरून समजतच. हसनच्या हजरजबाबी मुळे त्याच्याशी गप्पा मारल्या. इतक्या गर्दीतही तो माझ्याशी बोलत होता. त्याला शिकायची आहे. त्याच्या बोलण्यावरून समजल पण परिस्थीतीमुळ तो हे विकत असल्याच सांगतो. त्याच्या शर्टला आतून व बाहेरून असा दोन कप्प्यांचा खिसा होता. तो वस्तू विकली की काही पैसे आतल्या खिशातही ठेवत होता. ते विचारले त्यावेळी त्यान दिलेल्या उत्तराने अचंबीत झालो. हसन नववीत शिकत होता. त्याला शाळा बुडवून हे कराव लागत होते. तो ते करतही होता. त्याने वडीलांना सांगितल होत की, वारीत दुकान लावायला येईन पण त्यातन वहीसाठी पैसे काढीन. वडीलपण म्हटल्यावर आलो आहे, असे त्यान सांगितल. त्यामुळे त्याच्या शर्टला दोन खिशे होते.

वहीसाठी काही पैसे तो काढून आतल्या खिशात ठेवत होता. तर विक्रीचे पैसे बाहेरच्या खिशात. त्याची ही शक्कल शाळा शिकण्यासाठीच होती.  त्याला आठवीत 80 टक्के गुण मिळालेत. शिकून मोठा व्हायच ही त्याची माफक अपेक्षा मनाला स्पर्शून गेली. एकीकडे सर्व सुविधा.. स्पेशल क्लासेस... वेगळे कोचींग क्लास... हायफाय शाळा... सिबीएससी पॅर्टन अशा अनेक गर्तेत पालक मंडळी अडकून मुलांना चांगल शिक्षण देण्यासाठी धडपडताना दिसतात. त्याच कितपत सत्यता आहे.. त्यांची मुल किती शिकतात... ती कशी मोठी होतात... या सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत. मात्र वारीत सहभागी झालेल्या हसन सारख्या अनेक मुल आज शिकायची इच्छा असूनही शाळेत जावू शकत नाहीत. हेही वारीत स्पष्ट दिसल. कोणी भक्ती भाव घेवून वारीत आलय.. कोणी विठुरायाचा महिमा पहाण्यासाठी आलय... कोणी परंपरा म्हणून आलय... तर कोणी भक्ती मार्ग वाढावा म्हणून वारीत आलय.. त्या सगळ्यामध्येही मला हसनची अभ्यासाची श्रद्धा मनात घर करणारी ठरली.

त्याची शिकण्याची जिद्द व त्यासाठी वडीलांकडे धरलेला आग्रह म्हणजेच त्याच्या अभ्यासाच्या अधिक उजळ करणारा आहे. साडे अकराला माळीनगरचा मुक्काम हलला. तसा हसनही त्या गर्दीत सायकल पलवत सामील झाला. कदमवस्ती, श्रीपूर कारखाना अशा विसाव्यावेळी तो शोधूनही सापडला नाही. मात्र वही घेण्यासाठी त्याने प्लॅस्टिक विक्रीचा मार्ग खरच भक्ती मार्ग होता का, असा अनुत्तरीत प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला आहे.

loading image