esakal | दिवे घाटातील दरडींची सुप्रिया सुळेंकडून पाहणी 
sakal

बोलून बातमी शोधा

दिवे घाटातील दरडींची सुप्रिया सुळेंकडून पाहणी 

दिवे घाटातील दरडींची सुप्रिया सुळेंकडून पाहणी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गराडे - ""संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 20 जून रोजी सासवड मुक्कामी येत आहे. पालखीचा पुरंदर तालुक्‍यातील प्रवास नीरेपर्यंत आहे. पालखीसोबतच्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. दिवे घाटात 16 ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती मिळाली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका लक्षात आला. या धोकादायक दरडी तातडीने काढण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे,'' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे दिवे घाटातील दरडींची खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, नीरा बाजार समितीचे उपसभापती ईश्वर बागमार, प्रा. जितेंद्र देवकर, दिव्याचे उपसरपंच अमित झेंडे, प्रवीण शिंदे, श्‍याम टिळेकर होते. 

दिवे घाटात दरडींबरोबर गटारे अनेक ठिकाणी बंद आहेत. पावसाळ्यात गटारातील राडारोडा रस्त्यावर येऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे घाटातील सर्व बाबींची पाहणी करून आवश्‍यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी बातमी "सकाळ'मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी बोलण्याचे आश्‍वासन दिले.