विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान

बाळासाहेब चोपदार, कीर्तनकार, आळंदी देवाची
Tuesday, 4 July 2017

विठ्ठल परमार्थ आवडे वाट विठ्ठलाची
ही भावना उरी बाळगून सर्व जण अनंतकोटी ब्रह्मांडनायक भगवान परमात्म्याच्या भेटीला चालले आहेत. का तर ज्ञानोबा आणि तुकोबांनी परमात्म्याचे स्वरूप असणाऱ्या देवाच्या भेटीचा सोपा सुलभ मार्ग घालून दिला.

विठ्ठल परमार्थ आवडे वाट विठ्ठलाची
ही भावना उरी बाळगून सर्व जण अनंतकोटी ब्रह्मांडनायक भगवान परमात्म्याच्या भेटीला चालले आहेत. का तर ज्ञानोबा आणि तुकोबांनी परमात्म्याचे स्वरूप असणाऱ्या देवाच्या भेटीचा सोपा सुलभ मार्ग घालून दिला.

जिवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी
ही पंढरीला जाण्यासाठीची परमात्म्याबाबतची गोडी आहे. विठोबा प्राणसखा, ज्ञानोबा माझा, हे परमात्म्याचे स्वरूप मानून देवाच्या भेटीचा ज्ञानोबारायांनी पाया घालून दिला आणि तुकोबाराय कळस झाले. सर्व संतांना हाताशी धरून ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांनी वारीला आणले. या वारीमध्ये परमात्मा असणे महत्त्वाचे. भक्‍ताला देव जवळ करतात.

माझ्या भक्‍ताचा जो भक्‍त आहे तो मला इतका प्रिय आहे की तो प्राणापेक्षाही मला प्रिय आहे. वारीमध्ये वारकरी सेवाभाव, भक्‍तिभाव रूपाने चालत असतो. भोळे भाविक भक्‍तच भगवंताला आवडतात. हे भोळे भाविक भक्‍त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरची वारी पूर्ण करतात. आपले जीवनही असेच आहे, आपल्या जीवनामध्ये जो चढ-उतार आहे, तो भक्‍तिभावाचा आहे. तो चढ-उतार या वारीमधून मिळणाऱ्या पुण्यातून पूर्ण होतो. आजपर्यंत जीवनामध्ये जे पाप हातून घडले असेल ते जाऊ द्या, तुमचे दर्शन घेतल्यानंतर जी बॅटरी चार्ज होते ती अलौकिकतेची आणि अनुभूतीची बॅटरी ही वारीमध्ये पाहायला मिळते. एकदा वारीमध्ये आला की तो लोहचुंबकसारखा होतो. तो कोठेही गेला तरी तो आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला येतोच. हे एक वेगळ्या प्रकारचं संतांचं लोहचुंबक आहे. प्रत्येक जण आपल्या आत्मविश्‍वासाने, विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला येतो. विठ्ठलाचे दर्शन मिळाले नाही तरी कळसाचे दर्शन घेऊन त्यामध्ये परमात्याला प्रत्येक जण पहात असतो. हे दर्शन भगवंतालाही मान्य आहे. चंद्रभागेचे स्नान करतात, कळसाचे दर्शन करतात, वाळवंटामध्ये बसतात आणि आपली वारी पूर्ण करतात. प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो. कारण प्रत्येकामध्ये पांडुरंग परमात्मा आहे. वारीमध्ये आला की त्याची बॅटरी वर्षभर चार्ज राहते. यावरच तो आपली नित्यकामे करत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news palkhi sohala ashadhi ekadashi