...या झोपडीत माझ्या 

सचिन शिंदे, तुकोबाराय पालखी सोहळा
Thursday, 29 June 2017

इंदापूरचा मुक्काम आटोपून पालकी मार्गस्थ झाली. वडापूरी येथे विसावा झाला. लोकांच्या जेवणावळी पडल्या होत्या. ज्या दिंड्या बावड्यात जेवतात. त्या पुढ सरकत होत्या. तेथेच रानात अनंकांनी वाहने लावून पंगती केल्या होत्या. त्यातच माजी नजर एका झोपडीवजा घराकडे गेली. त्या घरात किमान दहा वारकरी जेवत होते.

इंदापूरचा मुक्काम आटोपून पालकी मार्गस्थ झाली. वडापूरी येथे विसावा झाला. लोकांच्या जेवणावळी पडल्या होत्या. ज्या दिंड्या बावड्यात जेवतात. त्या पुढ सरकत होत्या. तेथेच रानात अनंकांनी वाहने लावून पंगती केल्या होत्या. त्यातच माजी नजर एका झोपडीवजा घराकडे गेली. त्या घरात किमान दहा वारकरी जेवत होते.

तुटलेले छत, पावासामुळे गळू नये म्हणून त्यावर आच्छादलेला कागद, अंगणात तुळस, घराचा दरवाजा जुन्या पठडीतला जोरात धक्का दिला तर तुटावा असा. अशी स्थितीच घर मी न्हाळत होतो. तोच सत्तरीकडे झुकलेल्या मावशीचा आवाज कानावर पडला. यशोदा अक्का तीच नाव. घरात दुसर कुणीच नव्हत. होता तो मुलगा अपघातात गेला होता. या अज्जी शाळेबाहेर गोळ्या बिस्कीट विकतात. त्यांच कुटूंब मुळच कर्नाटकातल. पण कामा धंद्यासाठी ते हिकड स्थायिक झालेत. त्यांना सहज विचारल तर म्हणाल्या आता कोण आहे माझ. होतो तो गेला मुलगा. त्याच्या आधीच नवरापण गेला. गावकड आहेत काही पाव्हण. पण आता हा भाग सोडू वाटत नाही.

त्यांच्या खुलाशान मी सर्द झालो. त्याहून मला शाॅकींग होते ते त्यांच्या गोळ्या बिस्कीट विकण. त्यातून त्या कमावतात कीती हा भाग नंतरचाच. मात्र या वयात हे कराव लागत हेच भयानक होते. त्यांना सहज विचारल किती वारकऱ्यांचे जेवण करता. पंधरा वीस लोक जेवतात, त्यांच करते दरवर्षी. यंदाच सातव वर्ष आहे. ज्यांच्या घराच तुंबड्या भरुन पैसा आहे. धान्याच्या राशी आहेत. ती लोक काही देत नाहीत. मात्र यशोदा आजीच दायित्व खरच अशा पैेसेवाल्यांपेक्षा नक्कीच श्रीमंती दाखवणारे ठरते आहे. त्यांच्याच घरात दोन घास खाल्ले अन त्य  माऊलीचे पाय धरून सोहळ्यात सहभागी झालो. त्यावेळी निघालेल्या दिंडीत तुकोबरायांचाच.

बहुतां दिसा फेरा, आला या नगरा
नका घेऊ भार, धर्म तोची सार 
तुका मागे दान, द्या जी अनन्य... 

अंंभंग पखवाज व टाळाच्या गजराच म्हणत माझ्यापासून निघून गेली. मी जणू त्याचीच प्रचीती घेवून सोहळ्यात सामील झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news sant tukaram maharaj palkhi sohala