
आद्य समाज सुधारक, कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे महात्मा बसवेश्वर

Basweshwar Jayanti 2022
Basweshwar Jayanti 2022 : लिंगायत (Lingayat ) धर्माचे धर्मगुरु (Dharmaguru), विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर (Basweshwar ) यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो.

Basweshwar Jayanti 2022
कर्नाटकाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात संत महात्मा बसवेश्वरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय.

Basweshwar Jayanti 2022
आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडं पाहिलं जातं.

Basweshwar Jayanti 2022
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया दिनी इ.स. ११०५ मध्ये बसवेश्वर यांचा जन्म झाला. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचं कार्य क्रांतिकारक स्वरूपाचं आहे.

Basweshwar Jayanti 2022
भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडं पाहिलं जातं. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा इथं त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केलं होतं.

Basweshwar Jayanti 2022
बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असं सांगितलं जातं. धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशांत आले. लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात.

Basweshwar Jayanti 2022
बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, षड्दर्शने, पुराणांचा सखोल अभ्यास करून उच्चकोटीचे ज्ञान प्राप्त केले. संस्कृत, पाली, तामीळ या भाषांवरही प्रभुत्व मिळविले.

Basweshwar Jayanti 2022
आपल्या ज्ञानप्राप्तीतून त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. 'कायकवे कैलास' हा विचार त्यांनी मांडला. याचा अर्थ केवळ कष्टानेच स्वर्गाची म्हणजेच शिवाची, मोक्षाची प्राप्ती होते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं.
Web Title: Mahatma Basaveshwar Great Contribution To The Religious Social Cultural And Literary History Of Karnataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..