
जगातील सर्वात धोकादायक नद्या माहितीयत? जाणून घ्या खासियत

Dangerous Rivers in The World
नद्या ही निसर्गाची अनोखी देणगी मानली जाते. जगात अनेक सुंदर नद्या आहेत. जर तुम्ही नद्यांवर संशोधन केलं तर तुम्हाला अशा अनेक गोष्टी समोर येतील, ज्या तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक नद्यांबद्दल सांगणार आहोत.

Shanay-Timpishka River
शनाय-टिंपिशका (उकळणारी नदी), पेरू : ही अॅमेझॉन नदीची उपनदी असून या खळखळणाऱ्या नदीला बोम्बा म्हणूनही (Shanay-Timpishka River) ओळखलं जातं. ही 6.4 किमी लांबीची नदी तिच्या अत्यंत उच्च पाण्याच्या तापमानासाठी (45 °C ते सुमारे 100 °C पर्यंत) ओळखली जाते. या नदीच्या पाण्याला चुकूनही स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका.

Mississippi River, North America
मिसिसिपी नदी, उत्तर अमेरिका (Mississippi River, North America) : ही उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे. या नदीतील सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे, बुल शार्क आणि पाईक फिश, जे खूपच धोकादायक आहेत. अशा स्थितीत तुम्ही इथं पोहण्याचा विचारही करू शकत नाही.

Nile River, Egypt
नाईल नदी, इजिप्त (Nile River, Egypt) : जगातील सर्वात लांब नदी, नाईल नदीमध्ये मोठ्या प्रमाणात शिकारी आहेत. नाईल नदी 11 देशांमधून वाहते आणि भूमध्य समुद्राला मिळते. नदी जलद गतीनं फिरणाऱ्या मगरींसाठी प्रसिद्ध आहे, जे दरवर्षी सुमारे 200 लोकांचा बळी घेतात.

Congo River, Africa
काँगो नदी, आफ्रिका : काँगो (Congo River, Africa) ही जगातील सर्वात खोल नदी आहे, ती 720 फूट खोलीपर्यंत पोहोचते. नदी इतकी खोल आहे की, सूर्याची किरणंही तिच्या खोलीत जाऊ शकत नाहीत. नदीचा वरचा भाग अतिशय धोकादायक आहे, तर खालच्या भागात अनेक दऱ्या आणि विशाल झरे आहेत.

England River
नदी घाट, इंग्लंड : इंग्लंडची ही नदी (England River) तिच्या असंख्य छुप्या बोगद्यांसाठी ओळखली जाते, लोक इथं बोगदा पाहण्यासाठी येतात. यॉर्कशायरमध्ये वसलेली ही नदी तिच्या पाण्यात पडणाऱ्या प्रत्येकाचा जीव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Web Title: These Are The Most Dangerous Rivers In The World
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..