पालकत्व निभावताना... : कौटुंबिक उन्हाळी शिबीर...

आशिष तागडे
Sunday, 24 May 2020

मालविकाने टीव्ही लावला आणि त्यावर तिचा आवडता चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ लागला होता. या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन ती दरवर्षी समर कॅम्प अर्थात उन्हाळी शिबिराला जायला लागली. हे तिची आई वसुधाच्या दृष्टीने खूपच दिलासादायक होते. परीक्षा संपली की, ‘करमत नाही,’ अशी तिची आईभोवती भुणभुण सुरू व्हायची. उन्हाळ्याच्या सुटीतील शिबिर, संस्कार वर्गाच्या निमित्ताने मालविकावर काही संस्कार होतील, अशी वसुधाला आशा असायची आणि ती पूर्णही व्हायची. नाही म्हणायला तिच्या सासूबाई, सासरे आणि कधीतरी आई गावाकडून येत.

मालविकाने टीव्ही लावला आणि त्यावर तिचा आवडता चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ लागला होता. या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन ती दरवर्षी समर कॅम्प अर्थात उन्हाळी शिबिराला जायला लागली. हे तिची आई वसुधाच्या दृष्टीने खूपच दिलासादायक होते. परीक्षा संपली की, ‘करमत नाही,’ अशी तिची आईभोवती भुणभुण सुरू व्हायची. उन्हाळ्याच्या सुटीतील शिबिर, संस्कार वर्गाच्या निमित्ताने मालविकावर काही संस्कार होतील, अशी वसुधाला आशा असायची आणि ती पूर्णही व्हायची. नाही म्हणायला तिच्या सासूबाई, सासरे आणि कधीतरी आई गावाकडून येत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र त्यांना शहरी वातावरणात फार करमायचे नाही. आजी-आजोबा आले की, मालविका खूष असायची, कारण आजी गोष्ट सांगायला लागल्यावर ती रमून जायची. यावर्षी कोणत्या समर कॅम्पला जायचे याचे प्लॅनिंग मालविकाने केले होते. मात्र, वैद्यकिय तपासणीसाठी आजोबा आणि आजी मार्चमध्ये आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे ते थांबले होते. यंदा मात्र उन्हाळी शिबीर चुकेल याची पुसटशी शंका देखील मालविकाला आली नव्हती. लॉकडाउनचा कालावधी वाढायला लागला तशी उन्हाळी शिबिराची आशा मालवली.

एव्हाना सगळेच घरी असल्यामुळे शिबिराची आठवणही कोणाला झाली नाही. एक मात्र झाले होते, सुरुवातीचा उत्साह दिवसेंदिवस कमी व्हायला लागला होता. घरातून अजिबात बाहेर पडायचे नाही, ही बाब मालविका आणि तिच्या सोसायटीमधील मित्र-मैत्रिणींना अवघड वाटायला लागली.

आजीला आपल्या नातीची घालमेल लक्षात आली. तिने वसुधाकडे तसे बोलूनही दाखविले. दररोज सांयकाळी मालविकाचे पाच-सहा मित्र-मैत्रिणींना एकत्र करून संस्कार शिबीर घेऊ का, म्हणून त्यांनी तिच्याकडे विचारणाही केली. वसुधाला ही कल्पना आवडली. तिने सोसायटीच्या सचिवांची विशेष परवानगी घेऊन आणि सोशल डिस्टसिंगची खबरदारी घेऊन सासूबाईंना संस्कार शिबिर घेण्याबाबत सांगितले. सासूबाईंनी पडत्या फळाची आज्ञा मानून त्याच दिवशी शिबिरास सुरुवात केली. पहिल्या दिवशी आजींनी मुलांना त्यांच्या आवडीनिवडी, त्यांना आता काय हवेय याचा अंदाज घेतला.

दुसऱ्या दिवसापासून मुलांची आवड लक्षात घेऊन घरकामात उपयोगी पडतील असे टार्गेट दिले. टार्गेट पूर्ण केल्याबद्दल बक्षीसही दिले. सुरुवातीला बक्षिसामुळे कामाला लागली, मात्र आठवडाभरात त्यांना घरकामाची सवय झाली. कोणी आईला भाजी निवडण्यासाठी मदत करायला लागला, तर कोणी स्वच्छतेत आई-बाबांची मदत करायला लागला. एकाने तर चक्क आईबरोबर स्वंयपाक करण्यात सहभाग घेतला. मुलांना दररोज एक बोधकथा सांगत आजीने त्यांच्यामध्ये नकळतपणे व्यक्तिमत्व विकासाचे बीजारोपण केले.

दोन आठवड्यानंतर मुलांमधील झालेल्या बदलाने त्यांचे पालक चांगलेच सुखावले. ‘आई गं कंटाळा आला,’ हे वाक्य जाऊन ‘आई मी काय काम करू?’ अशी विचारणा व्हायला लागली. यावर आश्चर्यचकीत होऊन कधीही घरकामाला हात न लावणाऱ्या अनिशच्या आईने मालविकाच्या आजीला यामागचे रहस्य विचारले. त्यावर हसत-हसत त्या म्हणाल्या, ‘अगं, मुलांवर जबाबदाऱ्या टाकल्या ना तर ते पूर्ण करतातच. आपण फक्त त्यांच्यावर विश्वास दाखविला पाहिजे. थोडे त्यांच्या आणि थोडे आपल्या कलाने घेतल्यास काहीच अवघड नाही...’
उन्हाळ्यातील या कौटुंबिक शिबिरावर मात्र सारे खूष होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Aashish Tagade on Parenting