आपलेच दात... 

डॉ. अमोल अन्नदाते 
Saturday, 17 October 2020

दात येताना मुलांना ताप येतो, जुलाब लागतात, चिडचिड होते, हे सगळे गैरसमज असतात. दात येतानाच्या त्रासाचे कारण दात नसतात. दात येत असताना हिरड्या सळसळत असतात व काहीतरी तोंडात टाकून चावावे, खावे वाटत असते.

लहान मुलांची दातांची वाढ व समस्या ही बाब पालक व मूल दोघांसाठी तणावपूर्ण ठरते. तसेच दात कधी येतात व कधी पडतात हा पालकांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न असतो. 

जन्मजात दात असणे : 
जन्मतः समोर व वरच्या भागात दात असण्याचे प्रमाण २००० नवजात बालकांमध्ये एक असे आहे. असा दात नेपोलियन बोनापार्टला होता असा इतिहासात दाखला आहे. या दातांमुळे स्तनपान करत असताना आईला इजा होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला स्वतःच्या जिभेवर रुतून जिभेला जखम होण्याची शक्यता असते. तसेच हा दात आपोआप गळून फुप्फुसात गेला, तर न्युमोनिया होण्याची शक्यता असते. म्हणून जन्मतः असणारा दात दंतवैद्यांकडून काढून टाकलेला बरा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दात येण्याची प्रक्रिया : 
सुरुवातीचे दात- ज्याला आपण ‘दुधाचे दात’ म्हणतो व नंतर पक्के दात असे दोन प्रकारचे दात येतात. दातांची वाढ बाळ गर्भाशयात असतानाच सुरू झालेली असते. दुधाचे दात सहाव्या महिन्यापासून सुरू होतात व तीन वर्षांपर्यंत ते येणे सुरू राहते. काही मुलांमध्ये दात येण्यास थोडा उशीर होऊ शकतो. तेराव्या महिन्यापर्यंत एकही दात न आल्यास बालरोगतज्ज्ञांचा याविषयी सल्ला घ्यावा. साधारणतः दुधाचे दात पुढीलप्रमाणे येतात: 
सहा /सात महिने : खालचे, मधले, कातरे (Incisors) 
आठ महिने : वरचे दोन मधले व खालचे बाजूचे कातरे 
नऊ- दहा महिने : वरचे बाजूचे कातरे 
बारा महिने : वरील व खालील पुढील चार दाढा (Molars) 
सोळा महिने : खालचे व वरचे सुळके (Cannine) 
चोवीस महिने : मागच्या चार दाढा 

दात पडण्याची प्रक्रिया : 
दुधाचे दात पडण्याची प्रक्रिया सहा वर्षांपासून सुरू होते व बाराव्या ते तेराव्या वर्षापर्यंत सुरू राहते. दात पडतात तेव्हा मूल सुरुवातीला घाबरते. हे नॉर्मल आहे व यामुळे काही त्रास होणार नाही, याविषयी सुरुवातीला मुलाचे समुपदेशन करावे लागते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पक्के दात येण्याची प्रक्रिया : 
पक्के दात येण्याची प्रक्रिया तिसऱ्या महिन्यापासून सुरु होते व २५ वर्षा पर्यंत पूर्ण होते. 

दात येत असतानाच्या समस्या : 

दात येताना मुलांना ताप येतो, जुलाब लागतात, चिडचिड होते, हे सगळे गैरसमज असतात. दात येतानाच्या त्रासाचे कारण दात नसतात. दात येत असताना हिरड्या सळसळत असतात व काहीतरी तोंडात टाकून चावावे, खावे वाटत असते. त्यामुळे मूल हातात येईल ती वस्तू, खेळणी तोंडात टाकते व त्यातून जुलाब, ताप, जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे अशा वेळी बाळाला घट्ट अन्न खायला द्यावे. मूल काहीही तोंडात टाकत असेल, तर ते न करण्यास, न रागावता सांगावे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दात येण्यासाठी औषधे : 
दात येताना समस्या येऊ नये म्हणून तसेच दात चांगले यावे म्हणून बरीच औषधे विकली जातात; पण दात येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून दात नीट येण्यासाठी अशा कुठल्याही औषधांची गरज नसते. चांगला नियमित आहार पुरेसा असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Children teeth

Tags
टॉपिकस
Topic Tags: