सहकलाकाराचे सहकार्य महत्वाचे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

गुलशन देवैया आणि सागरिका घाटगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट आहे लागोपाठ अनेक खून करणाऱ्या खुनी माणसाची. सीबीआय ऑफिसर विवान देशमुख त्या खुन्यापर्यंत कसा पोचतो, हा प्रवास सांगणारी ही कथा आहे. 

गुलशन देवैया -सागरिका घाटगे 
एकीकडे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससाठी चित्रपट तयार करण्याचा ट्रेंड वाढत असताना फक्त टीव्ही माध्यमासाठी तयार केलेला ‘फूट फेरी’ हा चित्रपट नुकताच ‘अँड पिक्चर्स’वर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एक मनोवैज्ञानिक क्राईम थ्रिलर असून, यात गुलशन देवैया आणि सागरिका घाटगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट आहे लागोपाठ अनेक खून करणाऱ्या खुनी माणसाची. सीबीआय ऑफिसर विवान देशमुख त्या खुन्यापर्यंत कसा पोचतो, हा प्रवास सांगणारी ही कथा आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुलशन देवैया म्हणतो, ‘‘सागरिका यांनी भूमिका केलेला ‘चक दे’ चित्रपट मी पाहिला होता आणि या चित्रपटाच्या निमित्तानं मला सागरिकाबरोबर भूमिका करायला मिळणार याचा मला आनंद झाला होता. चित्रपटाच्या संहितावाचनाच्या वेळी आमची पहिली भेट झाली.’’ सागरिका घाटगे यात ‘देविका’ ही व्यक्तिरेखा साकारत असून ती विवानच्या प्रेमिकेची भूमिका करत आहे. सागरिका म्हणते, ‘‘हा चित्रपट थ्रिलर असल्यानं एक वेगळीच मजा शूटिंगच्या वेळी येत होती. आम्ही अनेक दृश्यांच्या तालमीसुद्धा केल्या होत्या. एखाद्या माणसाची मनोवस्था त्याला कोणत्या थरापर्यंत काय करायला भाग पाडते, हे या चित्रपटातून उलगडणार आहे.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सागरिका यांच्याबद्दल गुलशन म्हणाला, ‘‘सागरिका अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. विविध गोष्टींवर आमच्या गप्पा होत असायच्या. सहकलाकाराला ती उत्तम सहकार्य करते.’’ सागरिका गुलशनबद्दल बोलताना म्हणाली, ‘‘गुलशन अभिनेता म्हणून खूप गंभीर स्वभावाचा आहे; पण एक माणूस म्हणून फार मजेदार आहे. त्यांची संवादफेक उत्तम आहे.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सीबीआय ऑफिसरचं काम करताना गुलशन देवैयानं खूप मेहनत घेतली आहे. आपलं व्यक्तिमत्त्व हे त्या अधिकाऱ्याप्रमाणं वाटले पाहिजे, यासाठी त्यानं या भूमिकेची देहबोली कशी असली पाहिजे, याचा विचार केला. 
(शब्दांकन : गणेश आचवल) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Gulshan Devaiya Sagarika Ghatge