esakal | वुमन हेल्थ : प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जातानाची बॅग
sakal

बोलून बातमी शोधा

वुमन हेल्थ : प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जातानाची बॅग

हॉस्पिटलकडून काय दिले जाईल, कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि कपडे घेऊन जावेत हा प्रश्‍न अनेकांसमोर असतो. रुग्णालयासाठी आपली बॅग कशी तयार करावी याबद्दल सर्वसाधारण सूचना जाणून घेऊ. 

वुमन हेल्थ : प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जातानाची बॅग

sakal_logo
By
डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी बॅग भरताना त्यात नक्की काय असावे याबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये शंका असते. हॉस्पिटलकडून काय दिले जाईल, कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि कपडे घेऊन जावेत हा प्रश्‍न अनेकांसमोर असतो. रुग्णालयासाठी आपली बॅग कशी तयार करावी याबद्दल सर्वसाधारण सूचना जाणून घेऊ. 

बॅग कशी भरावी?
शक्य असेल तर दोन स्वतंत्र बॅगा भराव्यात. एक मातेसाठी आणि एक नवजात बालकासाठी.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बालकासाठीची बॅग
रॅपर किंवा दुपटे : बाळासाठी अत्यंत मऊसर सुती कापडाचे दुपटे आवश्यक असते. तुमच्या बॅगेत अशी किमान ५ ते १० दुपटी असणे आवश्यक आहे. दुपट्यांना पर्याय म्हणून जुन्या सुती साड्यासुद्धा चालतील. या साड्यांचे सुमारे १ मीटर लांबीचे तुकडे करून ते दुपट्याला पर्याय म्हणून वापरता येतात.

बाळासाठी हातमोजे, पायमोजे, टोपी व मऊ रुमाल : प्रत्येकाच्या किमान ५ ते १० जोड्या बॅगेत असणे आवश्यक आहे. काही जोड्या सुती असाव्यात, तर काही लोकरीच्या असाव्यात.

डायपर्स : बहुतेक हॉस्पिटल्समध्ये बाळासाठी डायपर्स दिली जातात. मात्र, तरी बॅगेत डायपर्सच्या ५ ते १० जोड्या ठेवू शकता. 

बेबी वाईप्स : बाळाला पुसून स्वच्छ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपल्या बॅगेत अशा बेबी वाईप्सचा एक पॅक असणे आवश्यक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाटी व चमचा : तुम्ही छोट्या आकाराचे दोन वाट्या किंवा बाउल आणि चमचे बरोबर ठेवू शकता. त्याचा उपयोग बाळाला फॉर्म्युला मिल्क पाजण्यासाठी होऊ शकतो.

आंघोळीसाठी साहित्य : हॉस्पिटलमध्ये बाळाला आंघोळ घालण्याचे काम नर्स करतात. बाळासाठी तेल, पावडर, साबण व इतर साहित्य चांगल्या ब्रँडचे व चांगल्या दर्जाचे तुम्ही घेऊ शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नेलकटर : काही अपवादात्मक वेळेस बाळाची नखे जास्त मोठी असल्यास ते नखाने स्वत:च्या शरीराला इजा करून घेऊ शकते. त्यामुळे बॅगेत बाळासाठीचे छोटे नेलकटर ठेवू शकता.
मातेच्या बॅगेबाबत माहिती घेऊ पुढच्या भागात.

loading image