esakal | गरोदरपणादरम्यानची झोपण्याची तंत्रे 
sakal

बोलून बातमी शोधा

गरोदरपणादरम्यानची झोपण्याची तंत्रे 

बरेचदा गरोदर महिलांकडून सामान्यपणे गरोदरपणाच्या काळात झोपावे कसे, कोणत्या स्थितीत झोपावे आणि त्याच्या कोणत्या पद्धती आहेत, याची विचारणा केली जाते.    

गरोदरपणादरम्यानची झोपण्याची तंत्रे 

sakal_logo
By
डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

बरेचदा गरोदर महिलांकडून सामान्यपणे गरोदरपणाच्या काळात झोपावे कसे, कोणत्या स्थितीत झोपावे आणि त्याच्या कोणत्या पद्धती आहेत, याची विचारणा केली जाते.    

पहिली तिमाही : गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत, कोणत्याही स्थितीत झोपायला अडचण नसते. यावेळी, बाळ खूपच लहान असल्याने गर्भवती महिलेला पाठीवर; तसेच दोन्ही बाजूंनी (कुशीवर) किंवा समोर तोंड करून झोपणे शक्य असते. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तिसरा ते पाचवा महिना : तिसरा महिना संपल्यानंतर ते पाचव्या महिन्यापर्यंत, गरोदर महिलांनी पोटावर झोपू नये. या महिन्यांत गर्भाशयात वाढ होत असल्याने, पोटावर झोपल्यामुळे गर्भाशय संकुचित होऊ शकते आणि यामुळे बाळाच्या वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो. यावेळी महिलेला सरळ स्थितीत किंवा दोन्ही कुशीवर झोपण्याचा सल्ला देण्यात येतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाचव्या महिन्यापासून पुढील कालावधी : या काळात महिलांनी पाठीवर, सरळ स्थितीत झोपू नये. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यापासून गर्भाशयाचा आकार हा वेगाने वाढण्यास सुरुवात होते. तसेच बाळाचा आकार देखील जलदरीत्या वाढतो. हृदयापासून शरीरातील इतर भागापर्यंत रक्त वाहून नेण्याचे कार्य मुख्य धमनी म्हणजे महाधमनी करत असते. अशावेळी गर्भवती महिला सरळ स्थितीत झोपल्यामुळे बाळाच्या वजनामुळे महाधमनी संकुचित होऊ शकते. याशिवाय शरीराच्या खालील भागांतील अवयवांना, विशेषत: गर्भाशय आणि पाय यांना रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. याचाच परिणाम अप्रत्यक्षरीत्या बाळाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावरही होऊ शकतो. अशा वेळी, दोन्ही कुशींवर झोपणे चांगले असते. पण काही वेळेला, अनेक महिलांना अशा स्थितीत झोपण्याची सवय नसल्यामुळे झोप नीट लागत नाही. अशा वेळी एक सोपा उपाय म्हणजे पाठीच्या खाली उशी ठेवून सरळ झोपून जाणे. यामुळे शरीर १५ डिग्रीने तिरके होते. ज्यामुळे बाळाचे वजन महाधमनीवर पडत नाही आणि रक्तपुरवठा सुरळीत राहतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आठव्या महिन्यापासून पुढील कालावधी : या दोन महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यायला पाहिजे. या कालावधीत डाव्या बाजूला (कुशीवर) झोपलेले अधिक सोयीस्कर असते. याचे मुख्य कारण म्हणजे या काळात गर्भाशय मध्यभागी न राहता थोडेसे उजवीकडे झुकलेले असते. अशा वेळी महिला त्यांच्या उजव्या बाजूला(कुशीवर) झोपली असेल, तर महाधमनी संकुचित होऊ शकते आणि याचाच परिणाम गर्भाशय आणि बाळाचा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यावर होऊ शकतो. 

यामुळेच, गरोदरपणाच्या काळात झोपेची सर्वात चांगली स्थिती म्हणजे ‘एसओएस’ - स्लीप ऑन साइड. हे सर्व करत असताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

loading image
go to top