esakal | वुमन हेल्थ : गरोदरपणातील काळजी.. 
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnancy-care

माता तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करताना दर दोन आठवड्यांनी तपासणी करावी लागते. बालकाच्या जन्मापूर्वी आणि त्यातही माता पहिल्यांदाच गरोदर राहत असेल,तर मातेने बालसंगोपनासाठी मार्गदर्शन घेणे चांगली कल्पना आहे.

वुमन हेल्थ : गरोदरपणातील काळजी.. 

sakal_logo
By
डॉ. आशा गावडे, स्त्री रोग तज्ज्ञ

आपण गेल्या भागात पहिल्या गरोदरपणाच्या दोन तिमाहीबद्दल माहिती घेतली आहे. 
तिसरी तिमाही - तिसऱ्या तिमाहीमध्ये माता आपल्या घरातच खिळून राहते आणि उत्तम प्रसूतीसाठी सर्व प्रकारे तयारी करते. त्याचवेळेला पोटातील गर्भही लांबी आणि वजनाने वाढतच असते. माता तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करताना दर दोन आठवड्यांनी तपासणी करावी लागते. बालकाच्या जन्मापूर्वी आणि त्यातही माता पहिल्यांदाच गरोदर राहत असेल, तर मातेने बालसंगोपनासाठी विशेष मार्गदर्शन घेणे चांगली कल्पना आहे. तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस गर्भ सुमारे २० ते २१ इंच लांबीचा झालेला असतो आणि त्याचे वजन अंदाजे ६ ते ९ पौंड असते. 

पौष्टिक आहार 
उत्तम गरोदरपण आणि सुलभ प्रसूतीसाठी उत्तम अन्नपदार्थ कोणते आणि कोणते पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत, तसेच सर्वोत्तम व्हिटॅमिन व खनिज द्रव्ये कोणती आहेत हे शिकून घेणे आवश्यक ठरते. आरोग्यपूर्ण गरोदरपणासाठी मातेने प्रतिदिन दररोज इतरांपेक्षा ३०० कॅलरीज अधिक खाणे आवश्यक आहे. या कॅलरीज प्रोटीन, फळे भाजीपाला व दर्जेदार अन्नधान्यातून मिळू शकतात. गोड व तळलेले पदार्थ कमीत कमी खावेत. आरोग्यपूर्ण आणि समतोल आहारामुळे नॉशिया आणि बद्धकोष्ठासारखी त्रासदायक लक्षणे कमी होतात. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

द्रव पदार्थांचे सेवन 
गरोदरपणातील आहारामध्ये विविध प्रकारच्या द्रव पदार्थांचे सेवन हा महत्त्वाचा घटक असतो. मातेने गरोदरपणाच्या काळात दररोज भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय विविध फळांचे रस आणि सूप सेवन करावे. कॅफेन आणि कृत्रिम स्वीटनरचा अतिरेक टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात मद्यपान कटाक्षाने टाळावे. 

व्यायाम 
गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम केल्यामुळे शारीरिक ताण कमी होऊन शरीराची झालेली हानी भरून निघण्यास मदत होते. गरोदरपणापूर्वीपासून मातेच्या व्यायामाचे प्रमाण कमी असले तरीही या काळात बहुतेक सर्व स्त्रियांना व्यायामासाठी प्रोत्साहन दिले जाते. गरोदरपणापूर्वी व्यायामाची सवय नसल्यास झेपेल त्याप्रकारे व्यायामाला प्रारंभ करावा. गरोदरपणादरम्यान व्यायाम सुरू करण्यापूर्वी हा व्यायाम सुरक्षित असण्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, काही महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व शारीरिक अडचणींमुळे त्यांना व्यायाम करणे शक्य होत नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मानसिक आरोग्य 
शारीरिरबरोबर मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. हा संपूर्ण काळ आनंदी, तणावमुक्त असण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शरीरावर कोणताही ताण न देता जोपासता छंद जोपासावे. आपल्या आवडत्या विषयाचे ऑनलाइन क्लासेस, बाळाच्या आगमनासाठी घरगुती तयारी, आवडते खाद्यपदार्थ बनवणे इत्यादी करू शकता. ते करताना पुरेशी झोप, आराम मिळेल याची काळजी घ्या. 

loading image
go to top