esakal | मेमॉयर्स : ऊर्जादायी प्रेरणास्रोत
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya-Naik

खरंतर माझी आई अस्मिता नाईक उत्तम कलाकार आहे. तिनं तरुणपणामध्ये अनेक पपेट शो, मिमिक्री, सूत्रसंचालन केलं. मात्र, तिच्याकडून अनेक गोष्टी राहून गेल्या. त्यामुळे मला कोणतीही संधी मिळाली तर ती प्रोत्साहनच देते. कारण, तिला कलेची जाण आहे. ती नेहमीच म्हणते, ‘कुठलीही संधी दोन वेळा येत नाही. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं कर.’ मला अभिनय आणि नृत्याची आवड आहे. त्यामुळे तिनं मला पहिल्यापासूनच प्रोत्साहन दिलं. हे कर किंवा ते करू नको, असं ती कधीच म्हणाली नाही.

मेमॉयर्स : ऊर्जादायी प्रेरणास्रोत

sakal_logo
By
अक्षया नाईक, अभिनेत्री

खरंतर माझी आई अस्मिता नाईक उत्तम कलाकार आहे. तिनं तरुणपणामध्ये अनेक पपेट शो, मिमिक्री, सूत्रसंचालन केलं. मात्र, तिच्याकडून अनेक गोष्टी राहून गेल्या. त्यामुळे मला कोणतीही संधी मिळाली तर ती प्रोत्साहनच देते. कारण, तिला कलेची जाण आहे. ती नेहमीच म्हणते, ‘कुठलीही संधी दोन वेळा येत नाही. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं कर.’ मला अभिनय आणि नृत्याची आवड आहे. त्यामुळे तिनं मला पहिल्यापासूनच प्रोत्साहन दिलं. हे कर किंवा ते करू नको, असं ती कधीच म्हणाली नाही. मी दहावीमध्ये असताना क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटक, डान्समध्ये हिरिरीनं सहभागी होत होते. मात्र, अभ्यास फारसा करत नव्हते. तरीही, तिनं अभ्यासासाठी माझ्यावर प्रेशर टाकलं नाही किंवा कोणत्याही एका गोष्टीसाठी फोर्स केला नाही. ती म्हणायची, जे करायचं ते मन लावूनच करा आणि त्यात शंभर टक्के योगदान द्या. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी करते. पहिली म्हणजे आलेली संधी सोडत नाही आणि दुसरी म्हणजे जे करायचं ते मन लावून करते. त्यातून मलाही खूप आनंद मिळतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आईनं मला अभिनय, डान्ससाठी खूप सपोर्ट केला. तिला लावणी हा प्रकार खूप आवडतो. त्यासाठी मी खूप वर्कशॉप केले. यासाठी तिनंही मला प्रोत्साहन दिलं. 

आपण जिथून सुरुवात करतो, त्याला कधीच विसरलं नाही पाहिजे, असं ती नेहमीच म्हणते. शाळा, कॉलेजमध्ये असताना मी वर्षाच्या शेवटी अभ्यास करायचे. इतर वेळी माझी कला जोपासायचे. शाळेमध्ये पहिलाच नंबर मिळवला पाहिजे, असं ती मला कधीही म्हणाली नाही. कलेची आवड आहे तर त्यात तू शंभर टक्के योगदान दे, असं ती नेहमी सांगते. त्यामुळेच दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आई स्वतः शिबिरांचा शोध घेई. तिथं मला घेऊन जाई. शिबिरं संपेपर्यंत थांबत असे. तिची कायनेटिक गाडी खूप फेमस होती. ती मला व बहिणीला याच गाडीवर सर्व ठिकाणी न्यायची. त्यामुळेच मी माझ्या सर्व आवडी-निवडी जोपासू शकले.

खरंतर आईचा हातभार, प्रोत्साहन असल्यामुळेच मी अभिनयात चांगल्या पद्धतीनं उतरू शकते. भविष्यामध्ये मला स्टेजवर आईबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. कारण, आईही एक कलाकारच आहे. सध्या मी ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लतिकाचं पात्र साकारत आहे. या भूमिकेमुळे मी घराघरांत पोचले. मला खूप प्रसिद्धी मिळाली.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

loading image